बीड येथे कंकालेश्वर मंदिर परिसरात दागिने चोरी करणार्या महिलेला पकडले; गुन्हा दाखल
स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख साबळे यांची कारवाई!

बीड | दि.13/09/2023 रोजी 14.30 वा. सुमारास पेठ बीड परिसरातील कंकालेश्वर मंदिराचे आंगनामध्ये फिर्यादी ह्या रुद्राक्ष घेण्यासाठी रांगेत थांबलेले असतांना अज्ञात महिलांनी फिर्यादीचे अंगावरील अडीच तोळयाचे गंठन किंमती 1,25,000/- रु चे तोडून चोरून नेले.
वरील फिर्याद वरून दिनांक 15/09/2023 रोजी गुरनं 220/ 2023 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणारे महिला व पुरुष अभिलेखावरील आरोपीतांची माहिती काढत असतांना दिनांक 23/09/2023 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नाळवंडी नाका, बीड येथील महिलेने सदरची चोरी केल्याची खात्री लायक खबर मिळाली तेव्हा पो.नि. स्थागुशांनी यांनी तात्काळ पो.उप.नि खटावकर व स्टाफ यांना रवाना केले.

नाळवंडी नाका, बीड येथे उभ्या असलेल्या महिलेस महिला अंमलदारामार्फत ताब्यात घेवून चौकशी केली असता तिने तिचे नाव लक्ष्मी नागनाथ दुबले रा.पेठ, बीड असे सांगितले. तिचे ताब्यातील पर्समध्ये 25 ग्राम वजनाचे गंठण मिळून आले असुन सदर गंठण बाबत विचारपुस करता तिने कंकालेश्वर मंदीरामध्ये दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळयातुन चोरुन घेतल्याचे सांगुन गुन्ह्याची कबुली दिली आहे.
जप्त दागिन्याचा मुद्येमाल व महिला आरोपीस पोलीस स्टेशन पेठ बीड यांचेकडे पुढील तपासासाठी स्वाधिन करण्यात आले असून पुढील तपास पो.ठा.पेठ बीड करीत आहेत. सदर महिला आरोपीकडुन इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.नंदकुमार ठाकुर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा येथील पो.नि श्री. पो.नि. संतोष साबळे, पो.उप.नि श्रीराम खटावकर, पो.ह. मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, पो.ना. सोमनाथ गायकवाड , महिला पो.शि. भाग्यश्री काशिद, चालक भाऊसाहेब कार्ले यांनी केली आहे