आजच्या बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना विविध व्हायरल इन्फेक्शन होणे सामान्य बाब आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्यांचे मूल निरोगी, तगडे आणि सशक्त असावे. त्यासाठी मुलांना योग्य आहार देणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांच्या मते, मुलांच्या पोषणासाठी अशा पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांच्या शरीराची वाढ होईल आणि स्टॅमिना वाढेल. चला तर मग, जाणून घेऊया लहान मुलांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खायला देणं महत्त्वाचं आहे.
पनीर
पनीर एक पोषणतत्त्वांनी भरपूर असलेला पदार्थ आहे. आहारतज्ञांच्या मते, पनीरमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, आणि खनिजांचा समावेश असल्यामुळे मुलांच्या हाडांची वाढ, स्नायूंची योग्य विकसित होणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणे यासाठी पनीर खूप फायदेशीर आहे. मुलांना पनीर तुम्ही विविध प्रकारे देऊ शकता.
अंडी
अंड्यांमध्ये प्रथिनांची अधिकता असते, जे मुलांच्या स्नायूंच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अंड्यात असलेल्या प्रथिनांमुळे मुलांना दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते, तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही चांगले राहते. मुलांना उकडलेली अंडी खायला दिली जातात, त्यापेक्षा त्यांना करी, सूप किंवा बारीक करून इतर पदार्थांमध्ये मिसळून दिल्यास ते जास्त आवडते.
सीड्स (बीया)
चिया बीया, भोपळ्याच्या बिया, आणि पांढरे तीळ या पदार्थांमध्ये पोषणाचे खूप महत्त्व आहे. हे बीयांमध्ये असलेल्या फायबर्स आणि पोषणतत्त्वामुळे मुलांना रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्यांना ताजेतवाने वाटते. या बीयांचा वापर मुलांच्या आहारात नियमितपणे करून, त्यांचे स्टॅमिना नक्कीच वाढवता येईल.
सम्बंधित ख़बरें




नट्स
नट्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात, जे मुलांच्या मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच, नट्स मुलांचे हाडे, दातांना मजबूत करण्यासाठी मदत करतात. यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही चांगले राहते. नट्सच्या सेवनामुळे वजन नियंत्रणात राहते आणि ऍलर्जी होण्याची शक्यता कमी होते.
प्रथिनेयुक्त पदार्थ
प्रथिने मुलांच्या शारीरिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असतात. प्रथिनेयुक्त पदार्थांमध्ये दही, बदाम, चणे, पीनट बटर, यांचा समावेश करणे मुलांच्या आहारासाठी उत्तम ठरते.
मुलांच्या आहारात या पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्याने त्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होईल. त्यांचा स्टॅमिना वाढवण्यास आणि दीर्घकाळ टिकाऊ आरोग्य मिळवण्यास मदत होईल.