Ashtavinayak Temples In Maharashtra | महाराष्ट्रातील अष्टविनायक गणेश देवस्थान यांची संपूर्ण माहिती
कोणती आहेत महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्रे
Ashtavinayak Temples In Maharashtra: तुम्ही सुट्टीच्या दिवसा मध्ये ट्रिप ला जाण्याचा विचार करत असाल व आपल्या परिवार व मित्रांसोबत देवास्थानाला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लाखो भाविकांचे प्रसिद्ध श्रध्दास्थान असणाऱ्या महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्रे आहेत या लेखात महाराष्ट्रातील तीन प्रसिद्ध जिल्ह्यांमध्ये स्थित आहेत; तुम्ही तुमच्या परिवार व मित्रांसोबत या ठिकाणी भेट दिल्यास एक वेगळाच अनुभव तुम्हाला मिळेल; आणि ह्या ठिकाणावरती जाण्याचा तुम्हाला वेगळाच आनंद मिळणार आहे.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या Ashtavinayak Temples In Maharashtra महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्रे
- मोरेश्वर– मोरगाव
- सिद्धिविनायक – सिद्धटेक
- बल्लाळेश्वर – पाली
- वरद विनायक – महाड
- चिंतामणी – थेऊर
- गिरिजात्मज – लेण्याद्री
- विघ्नेश्वर – ओझर
- महागणपती -रांजणगाव
- ही आठ देवस्थाने महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये स्थित आहेत- पुणे, रायगड, आणि अहिल्यानगर.
अष्टविनायक तीर्थक्षेत्रे यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात
1. मोरेश्वर देवस्थान – मोरगाव
पुणे जिल्हामधे मोरगाव या गावी मोरेश्वर देवस्थान आहे, पुण्यापासून साधारण ५५ किलोमीटर लांब आहे. अतिशय प्राचिन असे मंदिराचे बांधकाम आहे.मंदिर ५० फुट उंचीचे असून अत्यंत सुंदर आहे.मंदिराच्या आवारात दोन उंच दीपस्तंभ आहेत. मंदिराच्या बरोबर समोर एक मोठी मूषक प्रतिमा आहे. तसेच मंदिराच्या बाहेर गणेश प्रतिमेच्या सम्मुख एक काळ्या पाषाणातील मोठा नंदी आहे.ही एक असामान्य गोष्ट आहे कारण नंदी सामान्यतः शंकराच्या देवळासमोर असतो. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान तर्फे अनेक सुख सोयी येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
2. सिद्धिविनायक देवस्थान – सिद्धटेक
सिद्धिविनायक देवस्थान – सिद्धटेक देवस्थान सिद्धटेक या गावी कर्जत तालुका अहिल्यानगर जिल्हा याठिकाणी आहे.सिद्धिविनायक मंदिर पुण्यापासून २०० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी आहे. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे जिला सिद्धटेक म्हंटले जाते. मंदिरातील मूर्ती तीन फुट उंचीची असून उजव्या सोंडेची मूर्ती असलेले अष्टविनायकांतील हे एकमात्र मंदिर आहे, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. येथे ही भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान तर्फे अनेक सुख सोयी येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
3. बल्लाळेश्वर देवस्थान – रायगड
बल्लाळेश्वर देवस्थान – रायगड जिल्हामधे रोहा या ठिकाणापासून बल्लाळेश्वर देवस्थान २८ किलोमिटर अंतरावर आहे . हे मंदिर अंबा नदी आणि प्रसिद्ध सरसगड किल्ल्याच्या मध्ये स्थित आहे.बल्लाळेश्वर देवस्थान मंदिराचे दगडी बांधकाम आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि त्याची बांधणी अश्या प्रकारे केली आहे की सूर्योदयाच्या वेळी गणपतीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. स्थापत्य कलेच्या दृष्टीने सदर बल्लाळेश्वर मंदिर हे अत्यंत सुंदर आहे.
4. वरदविनायक देवस्थान- रायगड
वरदविनायक देवस्थान- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महाड या ठिकानी वरदविनायक देवस्थान आहे. सदर मंदिरापासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरे हे जोडली गेलेली आहेत. मंदिरातील मूर्ती पूर्वाभिमुख आहे. या मंदिराच्या चारही दिशांना चार हत्तींची स्थापना केली आहे. या मंदिरात अखंडदीप प्रज्वलित असतो. या देवस्थानचे वैशिष्ट असे आहे की भाविकांना गर्भगृहात जावून पूजा-अर्चा करण्याची परवानगी आहे.
5. चिंतामणी देवस्थान – पुणे
चिंतामणी देवस्थान – पुणे जिलह्यातील थेऊर या ठिकाणी चिंतामणी देवस्थान आहे. पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेले श्री चिंतामणी देवस्थान अष्टविनायकांतील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. अतिशय पुरातन असे मंदिराचे बांधकाम आहे ; हे मंदिर अतिशय विशाल असून दगडी बांधणीचे आहे. या मंदिरातील श्री गणेशाचीमूर्ती स्वयंभू असून मस्तकाशिवाय शरीराचे अवयव ठळकरीत्या दिसत नाहीत. मूर्तीच्या नेत्रांमध्ये हिरे आहेत.
6. गिरिजात्मज देवस्थान लेण्याद्री -पुणे
गिरिजात्मज देवस्थान लेण्याद्री -पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात श्री गिरिजात्मज देवस्थान गणेश लेण्यांमध्ये उंच अश्या डोंगरावर स्थित आहे, हे देवस्थान पुण्यापासून या मंदिराचे अंतर ९५ किलोमीटर आहे. या देवस्थान पासुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला जवळच आहे. भाविकांना गणपतीच्या दर्शनासाठी ३०० पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर शिल्प आणि स्थापत्याच्या दृष्टीने अलौकिक आहे; हे अतिशय साधे आणि प्राकृतिक असे आहे.
7. विघ्नेश्वर देवस्थान ओझर – पुणे
विघ्नेश्वर देवस्थान ओझर – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात श्री विघ्नेश्वर देवस्थान ओझर या गावी आहे. पुण्यापासून ८५ किलोमीटर अंतरावर आहे. पुणे-नाशिक रस्त्यावर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात कुकडी नदीच्या काठी हे मंदिर आहे. मंदिराच्या पूर्ण परिसराच्या चहुबाजूला भिंत आहे आणि एक विशाल प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या आवारात दोन उंच दीपस्तंभ आहेत. श्री गणेशाची मुख्य मूर्ती पूर्वाभिमुख आहे. श्रींच्या मस्तकावर आणि बेंबीत हिरा आणि डोळ्यांमध्ये माणके जडविली आहेत.
याठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीतर्फे सुंदर असे भक्तनिवास व वर्षभर अल्पदरात महाप्रसाद याची व्यवस्था करण्यात आली आहे.
8. महागणपती देवस्थान रांजणगाव – पुणे-नगर
महागणपती देवस्थान रांजणगाव – पुणे-नगर महामार्गावर पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर रांजणगाव येथे श्री महागणपती देवस्थान आहे. पूर्वाभिमुख मंदिराला सुंदर आणि भव्य प्रवेशद्वार आहे. मंदिराची बांधणी अशा प्रकारे केली आहे कि दक्षिणायनाच्या काळात सूर्योदयाच्या वेळी श्रींच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. श्रीमहागणपती मंदिरात वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते.
Ashtavinayak Temples In Maharashtra
निष्कर्ष:
ही होती महराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक मंदिरांची माहिती, जे भाविक या देवस्थान स्थळांना भेटी देऊ इच्छित आहेत अशांसाठी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अष्टविनायक यात्रेसाठी विशेष प्रवाशी गाड्यांची सोय करण्यात आलेली असते.