महाराष्ट्रराजकीय

मनसे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीची चर्चा? – खा.संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

दोन्ही भाऊ एकत्रच आहेत पण...

राज्यात गेल्या तीन-चार वर्षांत मोठी राजकीय उलथापालथ झालेली आहे. महाराष्ट्रातील नागरीक गेल्या तीन वर्षांपासून सत्तेसाठी मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यात विविध युत्या आणि आघाड्या निर्माण झाल्या. महाराष्ट्रातील दोन बलाढ्य पक्ष फुटले आणि राज्यात चार वेगवेगळे गट तयार झाले तरी या गटांमध्येच अतीतटीचा संघर्ष अजूनही चालूच आहे. अशातच या गटांनी राज्यातील लहान-मोठ्या पक्षांबरोबर हातमिळवणी केली. शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या (Shivsena Uddhav Balasaheb Thyackray) गटानेही वेगवेगळ्या पक्षांसमावेत आघाडी केली आहे. शिवसेना फुटल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले होते परंतु, हे दोन्ही भाऊ एकत्र आले नाहीत. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thyackray) गटातील खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे.

खा.संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आमच्याबरोबर घेण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Babasaheb Thackeray) पक्षात कधीच चर्चा झालेली नाही. अन ज्यांनी असा विषय याअगोदर काढला होता, ते ते शिवसेना सोडून गेले आहेत”. खा.संजय राऊत एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या राजकीय मुलाखतीच्या कार्यक्रमात असे म्हटले आहे. यावेळी खा.संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेनं (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) किंवा महाविकास आघाडीनं अनेक नवनवे मित्र आणि वेगवेगळे पक्ष आपल्यासमवेत सहभागी करून घेतले. उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर घरोबा केला होता. परंतु, या कालावधीत कधी महाराष्ट्र नवनिर्माणत सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आपल्याबरोबर घेण्याचा विचार आलाच नाही का? यावर प्रतिउत्तरात खा.संजय राऊत (MP. Sanjay Raut) म्हणाले कि, आमच्या पक्षात यावर कधीच चर्चा झाली नाही. काही लोकांनी याबाबत विषय काढला त्यांनीच पक्ष सोडला.
खा.संजय राऊत (MP. Sanjay Raut) यांना कार्यक्रमात विचारण्यात आलं की, तुम्हाला येणार्‍या काळात दोन्ही ठाकरे एक येण्याची काही शक्यता वाटते का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, ते दोघे म्हणेजच राज ठाकरे(Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाऊ आहेत. हे दोन्ही भाऊ एकच आहेत. कुटुंब म्हणून ते एकच आहेत. फक्त त्यांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत. कुटुंब निरंतर राहतं, नाते टिकवली जातात, कुटुंब म्हणून दोघेही एकच आहे. त्यांचे व्यक्तिगत चांगले संबंध आहेत आणि आम्हीदेखील पक्षाचे शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक दोघांसोबत चांगले संबंध जपतो. त्यात काहीच वावगं नाही. महाराष्ट्र आणि मराठी [Marathi] माणूस इतका दिलदार तर नक्कीच आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंच्या मनसेने अद्याप कुठल्याही पार्टीशी युती केलेली नाही. काही दिवसांपूर्वी भारताचे केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देशाच्या राजधानी दिल्लीत भेटीसाठी बोलावन्यात आलं होतं. या भेटीनंतर भाजप-मनसे (BJP-MNS) एकत्र येऊन युती करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. पण अद्याप याबाबत दोन्हीही पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button