(CM Devendra Fadnavis) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेली ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. मात्र आता राज्य सरकारने यामध्ये आपला भाग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे की, शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार रुपये मिळणार आहेत.
नागपूर येथील वनामती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याहस्ते ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’चा 19व्या हप्त्याचे वितरण ऑनलाइन पद्धतीने पार पडले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या या घोषणेची माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन अडचणी कमी होण्यास मदत होत आहे. तसेच राज्य सरकारही या योजनेसाठी आपले योगदान देत आहे आणि भविष्यात त्यात आणखी वाढ केली जाईल. शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळवण्याची घोषणा करून फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेला हा निर्णय स्पष्ट केला.
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी आणखी काही महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली. त्यानुसार, ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना’ यांचा दुसरा टप्पा आता सुरू होईल. त्यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचे सर्व भाग समाविष्ट होणार आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग आणि कॅश क्रॉपसाठी मदत देखील दिली जाणार आहे.
सम्बंधित ख़बरें





मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) पुढे सांगितले की, ‘ऍग्रीस्टॉक’ यामुळे दलालविरहित शेतीचे उद्दिष्ट साधता येईल. आता पर्यंत 54 टक्के शेतकरी यामध्ये सहभागी झाले असून, पुढील काळात 100 टक्के शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट करण्याचा उद्देश आहे. याशिवाय, शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या बाबतीतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात आले असून पुढील पाच वर्षे त्यांना वीज बिलांची चिंता नाही.
शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची घोषणा असून, यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे या योजनेतून शेतकऱ्यांना दिलेले पाठबळ निश्चितच त्यांचं आत्मविश्वास वाढवणारे ठरेल.