IOCL Recruitment 2025 | इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी 200 पदांसाठी भरती; जाणून घ्या कसा करावा अर्ज?
(IOCL) या पदांसाठी उमेदवारांना विविध शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अटींनुसार अर्ज सादर करावयाचे आहेत.

IOCL Recruitment 2025: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने आपल्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी २०० जागा भरण्याची घोषणा केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. (IOCL) या पदांसाठी उमेदवारांना विविध शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अटींनुसार अर्ज सादर करावयाचे आहेत. व अर्ज कुठे अन् कसा करायचा? हे आपण पुढे पाहणार आहोत.
माहितीनुसार, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या विविध विभागांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्यासाठी एकूण २०० पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इंडियन ऑइलमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदासाठी 55 रिक्त जागा आहे. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी 25 रिक्त जागा तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठीच्या १२० रिक्त जागा आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत वेगवेगळ्या अटी आहेत. प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक तपशील जाहीर करण्यात आले आहेत. IOCL Recruitment 2025

आवश्यक वय:
उमेदवाराचे वय अप्रेंटिस पदासाठी 18 ते 24 असणे. उमेदवारांची निवड नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे. IOCL Recruitment 2025 या नोकरीसाठी अर्जदाराची निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाईल.
शैक्षणिक पात्रता:
ट्रेड अप्रेंटिस पदाकरीत अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडेकडे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने इंजिनियरिंग मध्ये डिप्लोमा केलेला असावा. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने कुठल्याही विषयात ग्रॅज्युएशन केलेले असावे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील एक मोठी तेल आणि नैतिक कंपनी आहे आणि ही कंपनी देशभरात विविध उत्पादनांच्या पुरवठ्याचे काम करते. या कंपनीतील प्रशिक्षणार्थी पदे भरण्याच्या प्रक्रियेत उमेदवारांना उद्योगातील कार्याची संपूर्ण माहिती आणि अनुभव मिळण्याची संधी मिळेल. त्यामुळे या पदांवर काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया व तारीख
उमेदवारांना यासाठी https://nats.education.gov.in या लिंकवर क्लिक वरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत येण्यापूर्वी अर्ज पूर्णपणे सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करत असताना, उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रता, इतर संबंधित कागदपत्रांची माहिती आणि आवश्यक तपशील योग्य प्रकारे भरावेत.
मुलाखत चाचणी:
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक अटींपैकी उमेदवारांच्या पात्रतेची चाचणी केली जाईल. यासाठी योग्य उमेदवारांना पुढील प्रक्रियेतील तपासणी आणि मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. उमेदवारांना आपले कागदपत्रे, फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया:
अर्ज प्रक्रियेनंतर उमेदवारांना योग्य पात्रतेनुसार निवड केली जाईल. निवडीची अंतिम प्रक्रिया मुलाखतीच्या आधारावर किंवा लिखित चाचणीच्या माध्यमातून केली जाऊ शकते. निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य सुरू करण्याची संधी मिळेल.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कार्य करण्याची उत्तम संधी आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे.