ताज्या बातम्या

Mahadbt Drone Anudan Yojana | शेतकऱ्यांनो ड्रोनसाठी अर्ज करा, ४ लाख अनुदान मिळवा | अनुदान कोणाला मिळणार?

केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरन उप-अभियान

Mahadbt Drone Anudan Yojana: कृषिक्षेत्रात मानवविरहित वायू यान अर्थात ड्रोनच्या वापरास मोठ्या प्रमाणावर संधी आहे, कीटक नाशक औषधे, खत फवारणी या गोष्टींसोबतच कृषी क्षेत्राशी निगडित इतर कामांसाठी देखील ड्रोनचा वापर करू शकता.

ड्रोन अनुदान कोणाला मिळणार. – Who will get the Drone Anudan grant?

शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था यांना यांना ४० टक्के म्हणजे ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. कृषी व तस्सम पदवीधर यांना ५० टक्के म्हणजे ५ लाख रुपये अनुदान दिले जाईल. अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती ,लहान व सिमांतिक महिला शेतकरी यांना ५० टक्के म्हणजे ५ लाख रुपये तर सर्वसाधारण शेतकरी यांना ४० टक्के म्हणजेच ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

Mahadbt Drone Anudan Yojana

उपलब्ध माहितीनुसार किसान ड्रोन व त्यांच्याशी सलग्न जोडणी साहित्याची मूळ वास्तविक किंमत असेल त्यापैकी जे कमी असेल ते अनुदान संमधित लाभार्थी यांना मिळणार आहे.

Mahadbt Drone Anudan Yojana

ड्रोन अनुदान साठी आवश्यक कागदपत्रे – Required documents for Drone Anudan?

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवासी दाखला
  4. मोबाईल नंबर
  5. ई-मेल आयडी
  6. बँक खात्याचा तपशील
  7. ड्रोन चे कोटेशन बिल
  8. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  9. कृषी पदवी/शैक्षणिक प्रमाणपत्र
  10. स्वयंघोषणा पत्र
  11. पूर्वसंमती पत्र
  12. पासपोर्ट साईज फोटो

हे पण वाचा : धनादेश (चेक) देताना टाळावयाच्या सामान्य चुका आणि उपाय | तुम्ही तर करत नाहीत? हि चूक

ड्रोन अनुदान साठी अर्ज कसा करायचा? – How to apply for Drone Anudan?

ड्रोनसाठी ऑफलाईन तसेच ऑनलाईन प्रकारे अर्ज करता येणार आहेत. कृषी खात्याच्या इतर योजनांप्रमाणे महाडीबिटी पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ड्रोन वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यासाठी सदर योजना महत्वपूर्ण आहे.

ड्रोन अनुदान अर्ज करणार कुठे – Where to apply for Drone Anudan?

कृषी यांत्रीकीकरण या घटकामध्ये ड्रॉन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे .त्यामुळे आर्थिक वर्ष २०२४-२५ मधे
ड्रोन हा घटक ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था व कृषी तसेच कृषी क्षेत्राशी निगडित पदवीधर यांनी महाडीबिटी पोर्टलवर mahadbat.maharashtra .ov.in./former या संकेस्थळावर अर्ज करावेत तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व आर्थिक उन्नती साधण्यासाठी सदर योजनेचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांचा सदर योजनेतून वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहे

Mahadbt Drone Anudan Yojana
Mahadbt Drone Anudan Yojana

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button