ताज्या बातम्या

Pushpak Express Train Accident : ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले, अन् चिरडले गेले; जळगाव रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू !..

जळगावमध्ये एक दुःखद घटना घडली. पुष्पक ट्रेनमधून धूर येत असल्याचे पाहून अनेक प्रवाशांनी डब्यातून उड्या मारल्या आणि नंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली

Pushpak Express Train Accident : परधाडे तालुका. पाचोरा रेल्वे स्थानकावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेनने चिरडून 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात सुमारे 40 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सायंकाळी 04:15 च्या सुमारास घडली असे म्हंटले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याचे म्हटले आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले आहे.

जळगावमध्ये एक दुःखद घटना घडली. पुष्पक ट्रेनमधून धूर येत असल्याचे पाहून अनेक प्रवाशांनी डब्यातून उड्या मारल्या आणि नंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली, ज्यामुळे भीषण अपघात झाला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हे पण वाचा : पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा कशी पसरवली गेली ?

पुष्पक एक्सप्रेस जळगाव स्थानकातून सायंकाळी 04:00 वाजता पाचोरा येथे निघाली. लोकमत कडूनमिळालेल्या माहिती नुसार माहिजी-परधाडे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच एका डब्यात साखळी ओढण्यात आली. त्यानंतर, वेगाने येत असलेल्या ट्रेनने एकाएकी ब्रेक लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे रेल्वे रुळांवर आगीच्या ठिणग्या उडू लागल्या. ट्रेन परधाडे स्थानकावर थांबली. त्यानंतर, एका डब्यातील प्रवाशांनी त्या आगीच्या ठिणग्या पाहिल्यावर, डब्यात आग लागली असावी असे समजून 50 ते 60 लोक विरुद्ध ट्रॅकवर धावले. तेवढ्यात, विरुद्ध दिशेने कर्नाटक एक्सप्रेस वेगाने आली. त्यावेळी, ट्रॅकवरील प्रवासी धावू लागले असताना, काही जण ट्रेनखाली दुर्देवी चिरडले गेले.

12 जणांचे मृतदेह हाती
सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालात १२ जणांचे मृतदेह दाखल झाले. तर ५ जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेल्पलाईनवर सेवा उपलब्ध
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील 0257-2217193 या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button