Walmik Karad CCTV Footage : खळबळजनक बातमी! बीडमधील खंडणी प्रकरणातील नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर, सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये
वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी-पोलीस एकत्र दिसले

Walmik Karad CCTV Footage : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात एका धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजने नवे वळण घेतले आहे. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये खंडणी मागणारे सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये दिसत आहे, ज्यात मुख्य आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे यांच्यासह इतर आरोपी देखील आहेत.
खंडणी मागणारी घटना आणि सीसीटीव्ही फुटेज
सीसीटीव्ही फुटेज 29 नोव्हेंबर 2024 रोजी घडलेल्या एका खंडणीच्या घटनेचा आहे. यामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि इतर आरोपी अवादा कंपनीकडून 02 कोटी रुपयांची खंडणी मागताना दिसत आहेत. खास गोष्ट म्हणजे काही पोलीस अधिकारी देखील यांच्यासोबत दिसत आहेत, ज्यामुळे या प्रकरणाच्या तपासात आणखी एक नवे वळण येऊ शकते.
हे पण वाचा: महाराष्ट्रातील अष्टविनायक गणेश देवस्थान यांची संपूर्ण माहिती
हे पण वाचा: धनादेश (चेक) देताना टाळावयाच्या सामान्य चुका आणि उपाय | तुम्ही तर करत नाहीत? हि चूक
हे पण वाचा: शेतकऱ्यांनो ड्रोनसाठी अर्ज करा, ४ लाख अनुदान मिळवा | अनुदान कोणाला मिळणार?
Walmik Karad CCTV Footage
आवादा कंपनीला 29 नोव्हेंबर 2024 ला खंडणी मागितली त्या दिवशीचा cctv हाती लागला. वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे हे त्यामध्ये दिसत आहेत.#संतोष_देशमुख #SantoshDeshmukh #Beed #WalmikKarad #Awada #CCTVFootage pic.twitter.com/tAr5Db9bRv
— Ganesh Pokale… (@P_Ganesh_07) January 21, 2025
आवादा कंपनीकडून तक्रार
आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, २० नोव्हेंबर रोजी त्यांना विष्णू चाटेच्या फोनवरून धमकी आली होती. वाल्मिक कराडने फोनवरून धमकी दिली होती, “कर नाहीतर मी तुझे हात-पाय तोडीन,” असे सांगितले होते. या धमकीनंतरच, संजय शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
विष्णू चाटेच्या कार्यालयाजवळ असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यासोबत कृष्णा आंधळे आणि इतर आरोपी देखील दिसत आहेत. हे फुटेज २९ नोव्हेंबर २०२४ चे आहे, ज्या दिवशी खंडणी मागणारी घटना घडली होती. यात सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत, ज्यामुळे पोलिसांचा तपास आणखी सुस्पष्ट होईल.
तपासाची दिशा आणि पुढील कारवाई
या प्रकरणी, हत्येचे मास्टरमाइंड वाल्मिक कराड अटकेत आहे. त्याच्यावर मकोका कायदा लावण्यात आला आहे, तसेच खंडणी मागण्याच्या आरोपावरून विष्णू चाटे आणि इतर आरोपी अटक करण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना आरोपींविषयी महत्त्वाची माहिती मिळाली आहे, आणि आता तपास आणखी पुढे वाढवला जाईल.