Gold & Silver Price | सोने कडाडले, तर चांदी स्वस्त! आयात शुल्कातील वाढीमुळे भावात मोठी उडी; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold & Silver Price | भारतीय बाजारपेठेत (Indian Market) सोन्याच्या किमतीने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात (Import Duties) केलेल्या मोठ्या वाढीमुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज 15 मे 2026 रोजी सकाळच्या सत्रात देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव वधारले आहेत. दुसरीकडे, चांदीच्या दरात मात्र काहीशी घसरण (Decline In Silver Prices) झाल्याने चांदी खरेदी करणाऱ्यांना अल्पसा दिलासा मिळाला आहे.

सोन्याची झळाळी वाढली, सामान्यांच्या खिशाला झळ

दिल्लीच्या सराफा बाजारात (Delhi Bullion Market) सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 1,62,270 रुपयांवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत शुद्ध सोन्याच्या दरात सुमारे 650 रुपयांची वाढ (Increase In Rupees) झाली असून, काही ठिकाणी हा भाव 1,66,000 रुपयांच्या घरात गेला आहे. लग्नसराईचा हंगाम आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे सोन्याची मागणी, (Demand For Gold Rises Due To Developments In The Global Market.) वाढत असल्याने ही दरवाढ होत आहे.

Gold & Silver Price | Delhi Bullion Market
Gold & Silver Price | Delhi Bullion Market

 

हे पण वाचा: Instant Loan हवंय? या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि Credit Score झपाट्याने सुधारवा! 

दर वाढण्यामागे ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

सोन्याचे भाव वाढण्यामागे केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय कारणीभूत ठरला आहे. सरकारने 13 मे पासून सोने आणि चांदीवरील आयात कर 6 टक्क्यांवरून थेट 15 टक्के केला आहे. कर वाढल्यामुळे परदेशातून येणारे सोने महाग झाले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेला राजकीय तणाव आणि अमेरिकन डॉलरच्या (American Dollar) तुलनेत भारतीय रुपयाची (Indian Rupee) झालेली घसरण (95.73 नीचांकी पातळी) यामुळे सोन्याच्या किमती भडकत आहेत.

हे पण वाचा: कमी पगारातही घर कसं चालवायचं? महागाईवर मात करण्यासाठी वापरा या 9 ‘स्मार्ट’ टिप्स!

तुमच्या शहरातील सोन्याचे ताजे भाव (प्रति 10 ग्रॅम)

देशातील विविध प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात फरक दिसून येत आहे. राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,48,960 रुपयांवर नोंदवला गेला आहे.

मुंबई, पुणे, कोलकाता आणि बंगळुरू या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,62,340 रुपये असून, 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 1,48,810 रुपये मोजावे लागत आहेत.

या संदर्भातील, चेन्नईमध्ये सोन्याचे दर देशातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,64,190 रुपयांपर्यंत पोहोचला असून, त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे विशेष लक्ष या बाजाराकडे लागले आहे.

हे पण वाचा: तुमचे पैसे आहेत का सुरक्षित बँकेत? आरबीआयने जाहीर केली देशातील सर्वात सुरक्षित १० बँकांची यादी

चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा

एककीडे सोने महाग (Gold Is Expensive) होत असताना चांदीने (Gold & Silver Price) मात्र ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे. आज चांदीच्या दरात घट (Silver Price Drops Today) नोंदवण्यात आली असून, एक किलो चांदीचा भाव 2,99,900 रुपयांवर स्थिरावला आहे. काल दिल्लीच्या बाजारात चांदी 900 रुपयांनी स्वस्त झाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला चांदीने 4 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता, त्या तुलनेत आताचे दर कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत (Silver Prices in the International Market) सध्या 87.04 डॉलर प्रति औंस इतकी आहे.

हे पण वाचा: सावली देणार्‍या एका झाडाने शेतकर्‍याचे बदलले नशीब; | कोर्टाने मान्य केली किंमत! | किंमत मात्र कोटींच्या घरात!

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची वेळ

सध्याची जागतिक परिस्थिती (Current Global Situation) पाहता मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने चढ-उतार (Continuous Fluctuations In Metal Prices.) होण्याची शक्यता आहे. सोन्यावरील आयात कर वाढल्यामुळे आणि रुपया कमकुवत (Rupee Weakens) झाल्यामुळे येणाऱ्या काळातही सोने स्वस्त (Gold is cheaper) होण्याची चिन्हे कमी आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक सध्या अत्यंत सावधगिरीने पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे

हे पण वाचा: Small Finance Bank FD Rates 2026 | मुदत ठेवींवर मिळतंय जास्त व्याज; पण तुमची गुंतवणूक किती सुरक्षित? जाणून घ्या सविस्तर

टीप: सोन्याचे दर स्थानिक कर, मेकिंग चार्जेस आणि बाजारातील मागणी-पुरवठ्यानुसार बदलू शकतात!….

WhatsApp Icon Telegram Icon