महायुती सरकारने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. होळी सणाच्या निमित्ताने महिलांना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Holi gift) एक खास भेट देण्याचे ठरवले आहे. राज्य सरकारने रेशन दुकानांद्वारे महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य दिसू लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महिलांसाठी अर्ध्या तिकिटावर बस प्रवासाची योजना आणली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Holi gift) लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनांमुळे महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केले आणि आता होळी सणाच्या निमित्ताने आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Holi gift) महिलांना रेशन दुकानातून मोफत साडी देण्याचे ठरवले आहे. विशेषत: अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या महिलांना याचा फायदा होईल. या साड्यांचे वितरण राज्याच्या पुरवठा विभागाने सुरू केले आहे आणि प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये साड्यांचे गठ्ठे पोहोचवले जात आहेत. होळी सणापूर्वी प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला एक साडी दिली जाईल.
साडी कशी मिळेल?
साडी मिळवण्यासाठी महिलांना रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर (e-POS machine)अंगठा ठेवल्यानंतर एक कार्ड दिले जाईल. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Holi gift) त्या कार्डावर एक साडी दिली जाईल. राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे.
सम्बंधित ख़बरें





जळगाव जिल्ह्यातील 1 लाख 35 हजार 302 महिलांना होळी सणाच्या पूर्वी साडी मिळणार आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Holi gift) यासाठी रेशन दुकानांवर साड्यांचे वितरण सुरू झाले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर साड्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी दिली.
महिलांनी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Holi gift) होळी सणाच्या निमित्ताने साडी मिळण्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. मात्र, काही महिलांनी साडीचा दर्जा चांगला असावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महिलांना त्यांचा आवडता रंग आणि चांगला दर्जा मिळेल का, याबद्दल संभ्रम आहे.