Paytm New Feature | ATM कार्ड विसरा! आता फक्त ‘Face Unlock’ ने होणार पेमेंट; Paytm ची नवीन सुविधा लाँच

Paytm New Feature

डिजिटल पेमेंटच्या दुनियेत क्रांती घडवून आणणाऱ्या पेटीएमने (Paytm) आपल्या युझर्ससाठी दोन जबरदस्त (Paytm New Feature) फीचर्स लाँच केली आहेत. आता पैसे काढण्यासाठी तुम्हाला खिशात एटीएम कार्ड (ATM card) ठेवण्याची गरज नाही, तसेच युपीआय पेमेंट करण्यासाठी वारंवार पिन (PIN) टाकण्याचे टेन्शनही उरलेले नाही. कंपनीने आपल्या ॲपमध्ये बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन आणि कार्डलेस कॅश विड्रॉलची (Cardless Cash Withdrawal) सुविधा सुरू केली आहे.

आता पिन विसरलात तरी काळजी नको!

अनेकदा घाईगडबडीत आपण युपीआय पिन (UPI PIN) विसरतो किंवा गर्दीच्या ठिकाणी पिन टाकताना तो कोणाला दिसेल अशी भीती वाटते. आता या समस्येवर पेटीएमने तोडगा काढला आहे. नवीन अपडेटनुसार, (Paytm New Feature) आता युझर्स फिंगरप्रिंट किंवा ‘फेस अनलॉक’ (चेहरा ओळखून) द्वारे पेमेंट करू शकतील. ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा फोन अनलॉक करता, त्याच पद्धतीने आता तुमची ओळख पटवून व्यवहार पूर्ण होईल. यामुळे पेमेंटची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित झाली आहे.

Paytm New Feature Fingerprint or Face Unlock
Paytm New Feature Fingerprint or Face Unlock

हे पण वाचा: उन्हाळ्यात तुमचा फोन तापतोय का? फॉलो करा या 5 सोप्या टिप्स! वाचवतील तुमचा खर्च!

सुरक्षेचा दुहेरी पदर

बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन (Biometric Authentication) केवळ सोयीचे नाही, तर ते अधिक सुरक्षितही आहे. पिन चोरला जाऊ शकतो, पण फिंगरप्रिंट (fingerprint… किंवा फेस डेटा (Face Data) हा प्रत्येकाचा स्वतंत्र (Unique) असतो. त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या खात्यातून कोणीही व्यवहार करू शकणार नाही. फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता, Paytm New Feature युझर्ससाठी एक मोठे सुरक्षा कवच ठरणार आहे.

Paytm New Feature Biometric Authentication
Paytm New Feature Biometric Authentication


हे पण वाचा: Vivo T5 Pro 5G | 9020mAh बॅटरी असलेला जगातील सर्वात स्लिम फोन! | पाहा किंमत आणि भन्नाट फीचर्स!

दुसरे सर्वात मोठे अपडेट म्हणजे ‘कार्डलेस एटीएम विड्रॉल’ (Cardless ATM Withdrawal). अनेकदा आपण घरातून बाहेर पडताना पाकीट विसरतो, पण मोबाईल नेहमी सोबत असतो. अशा वेळी जर तुम्हाला रोकड हवी असेल, तर तुम्ही Paytm App च्या मदतीने थेट एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला एटीएम मशीनवर दिसणारा क्यूआर (QR) कोड फक्त स्कॅन करावा लागेल आणि तुमच्या मोबाईलवरून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Paytm New Feature
Paytm New Feature – Cardless ATM Withdrawal


हे पण वाचा: ओप्पोचा नवा धमाका! Oppo Find x10 Pro Series मध्ये मिळणार 8000mAh बॅटरी आणि 200MP कॅमेरा

पैसे काढण्याची पद्धत अत्यंत सोपी

विना कार्ड पैसे काढण्यासाठी सर्वात आधी Paytm App उघडा. तिथे तुम्हाला ‘Cash Withdrawal’ किंवा ‘ATM Withdrawal’ हा पर्याय निवडावा लागेल. तुम्हाला किती रक्कम काढायची आहे, ती टाका. त्यानंतर एटीएम मशीनच्या स्क्रीनवर असलेला QR Code Scan करा. ही प्रक्रिया पूर्ण होताच मशीनमधून रोकड बाहेर येईल. ही सुविधा अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे जे कार्ड बाळगणे टाळतात किंवा कार्ड हरवण्याची भीती वाटते.

Paytm New Feature Cash Withdrawal
Paytm New Feature Cash Withdrawal

हे पण वाचा: १००% चार्जिंग टाळा, बॅटरीचे आयुष्य वाढवा; वाचा महत्वाची माहिती

तंत्रज्ञानातील या बदलांमुळे आता बँकेचे व्यवहार आणि दैनंदिन खरेदी अधिक सोपी झाली आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि युझर्सचा अनुभव सुखकर डिजिटल पेमेंट सोपे करण्यासाठी Paytm New Feature म्हणून उचललेले हे पाऊल भविष्यात खूप महत्त्वाचे ठरेल. आता खिशात डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसले किंवा UPI PIN लक्षात नसला, तरी तुमचे पेमेंट अडणार नाही!…

WhatsApp Icon Telegram Icon