BSNL कडून नवा धडाका! आता सिमकार्ड मिळेल फक्त 90 मिनिटांत तुमच्या दारात

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) आता अधिक आधुनिक आणि ग्राहकांसाठी सोयीची सेवा घेऊन आली आहे. जिथे खाजगी कंपन्या जलद इंटरनेट आणि घरपोच सुविधा देऊन बाजारात आघाडीवर आहेत, तिथे BSNL ने एक नवीन पाऊल टाकत आपल्या ग्राहकांसाठी सिमकार्ड घरपोच देण्याची सेवा सुरू केली आहे.

याचा अर्थ असा की, आता BSNL चं सिमकार्ड घेण्यासाठी तुम्हाला दुकानात, टेलिकॉम सेंटरमध्ये किंवा किऑस्कवर जायची गरज नाही. फक्त ऑनलाइन फॉर्म भरून ऑर्डर द्या आणि 90 मिनिटांत तुमचं सिमकार्ड तुमच्या घरी पोहोचेल!

ही सेवा सुरुवातीला ठराविक शहरांमध्ये सुरू करण्यात आली असून लवकरच ती देशभरात उपलब्ध होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ही नवी सेवा कशी वापरायची आणि तिचा लाभ कोणत्या ग्राहकांना होणार आहे.

BSNL सिमकार्ड घरपोच सेवा म्हणजे नेमकं काय?

आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाइन मागवल्या जातात – अन्न, कपडे, औषधे… मग सिमकार्ड का नाही? हेच लक्षात घेऊन BSNL ने ग्राहकांना ऑनलाइन सिम बुक करून घरपोच मिळवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

कंपनीने एक अधिकृत भागीदार Prune.co.in या वेबसाइटसोबत करार केला आहे. या वेबसाईटवर जाऊन ग्राहक आपली माहिती भरून सिमकार्ड ऑर्डर करू शकतात.

एकदा ऑर्डर दिल्यानंतर, फक्त 90 मिनिटांच्या आत BSNL चा प्रतिनिधी सिमकार्ड घेऊन तुमच्या पत्त्यावर पोहोचतो. हे सिमकार्ड सक्रिय करून दिलं जातं आणि तुम्ही लगेच BSNL च्या नेटवर्कचा वापर सुरू करू शकता.

ही सेवा वापरण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

जर तुम्हाला BSNL सिमकार्ड पाहिजे असेल आणि तेही घरी बसून, तर खाली दिलेल्या पायऱ्या फॉलो करा:

प्रथम https://prune.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

तिथे ‘BSNL सिमकार्ड’ पर्याय निवडा.

तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा.

सिमकार्ड कोणत्या प्रकारचं हवं आहे ते निवडा – प्रीपेड किंवा पोस्टपेड.

ऑर्डर सबमिट करा.

बस्स! आता पुढच्या 90 मिनिटांत BSNL चं अधिकृत प्रतिनिधी तुमच्या दारात येईल आणि तुमचं सिमकार्ड देईल.

 

सिमकार्डसह मिळणाऱ्या सुविधा

ही सेवा केवळ सिमकार्ड पुरवठ्यावर थांबत नाही. ग्राहकांना सिमकार्ड देताना KYC प्रक्रिया देखील पूर्ण केली जाते. म्हणजे ओळखपत्र, फोटो आणि आधार कार्डसारखी माहिती तिथेच घेतली जाते. यामुळे सिमकार्ड ताबडतोब सक्रिय केलं जातं.

तुम्ही नवीन सिम घेत असाल, नंबर पोर्ट करत असाल किंवा दुसऱ्या नेटवर्कवरून BSNL मध्ये येत असाल – कोणत्याही प्रकारासाठी ही सेवा उपयुक्त आहे.

BSNL 4G आणि 5G सेवेसाठी सज्ज

BSNL सध्या मोठ्या प्रमाणावर आपल्या नेटवर्कमध्ये सुधारणा करत आहे. आतापर्यंत केवळ 2G आणि 3G वर चालणाऱ्या कंपनीने आता 4G आणि 5G सेवा सुरू करण्याचं ठरवलं आहे. या वर्षीच्या जूनपासून BSNL चं 4G नेटवर्क थेट 5G मध्ये बदलणार आहे.

BSNL ला सरकारकडून 700 MHz आणि 3300 MHz या दोन महत्त्वाच्या 5G फ्रिक्वेन्सी मिळाल्या आहेत. यामुळे BSNL आता Jio आणि Airtel सारख्या खाजगी कंपन्यांना थेट स्पर्धा देण्यासाठी सज्ज झाली आहे.

9 कोटी ग्राहकांचा विश्वास

दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकतंच सांगितलं की, गेल्या सहा-सात महिन्यांत BSNL ने ५५ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. यामुळे BSNL चा एकूण ग्राहकसंख्या आता ९.१ कोटी पार गेली आहे. हे यश केवळ किफायतशीर दर, विश्वासार्ह सेवा आणि सरकारी पाठबळामुळे शक्य झालं आहे.

ग्राहक सेवा महिना आणि नेटवर्क विस्तार

BSNL ने एप्रिल 2025 महिन्याला “ग्राहक सेवा महिना” म्हणून साजरा केला होता. या काळात ग्राहकांच्या तक्रारी जलद सोडवणे, सेवा सुधारणे आणि नेटवर्क मजबूत करणे यावर भर देण्यात आला.

तसेच, कंपनीने १ लाख 4G साइट्स सुरू करण्याचा संकल्प केला असून त्यातील ८९,००० साइट्स आधीच कार्यरत झाल्या आहेत. यामुळे लवकरच देशभर BSNL चं 4G आणि 5G नेटवर्क पाहायला मिळेल.

धडाकेबाज टिम  के बारे में
For Feedback - admin@dhadakebaaz.com
WhatsApp Icon Telegram Icon