How To Keep Instagram Account Safe : आजकाल, स्मार्टफोन (Smartphone) आणि सोशल मीडिया (Social Media) च्या वापरामुळे इंस्टाग्राम (Instagram) चा उपयोग सर्वसामान्य लोकांपासून ते मोठ्या सेलिब्रिटीं (Celebrities) पर्यंत सर्व करत आहेत. फोटो (Photos), रील्स (Reels) आणि स्टोरीज (Stories) शेअर करणं हा एक ट्रेंड (Trends) बनला आहे, पण याचसोबत काही अशी चुका देखील केल्या जातात, ज्यामुळे तुमचं इंस्टाग्राम अकाउंट बॅन (Instagram account ban) होऊ शकतं. जर तुम्हाला तुमचं अकाउंट बंद होण्यापासून वाचवायचं (How To Keep Instagram Account Safe) असेल, तर खालील काही गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे.
इंस्टाग्रामवर अकाउंट कधी बॅन होतं?

इंस्टाग्राम एक कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वांसोबत काम करतं. जर तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलं, तर तुमचं अकाउंट बॅन होऊ शकतं. यामध्ये अश्लील कंटेंट (Obscene Content) शेअर करणं, त्याचप्रमाणे, जर तुम्ही तुमच्या पोस्ट किंवा रील्सवर प्रतिबंधित हॅशटॅग्सचा वापर केला, तर ते देखील तुमचं अकाउंट बॅन करण्याची कारण ठरू शकतात. (How To Keep Instagram Account Safe ) त्यासोबतच, तुम्ही तुमचं प्रोफाइल खोटं दाखवण्याचा प्रयत्न केल्यास, त्यावर देखील कारवाई होऊ शकते.
इंस्टाग्रामच्या नियमांचे पालन करा

इंस्टाग्रामवर पोस्ट करताना, तुम्हाला खात्री करणे महत्त्वाचे आहे की तुम्ही कम्युनिटी गाइडलाइन्स (Instagram Community Guidelines) चे पालन करत आहात. तुम्ही कोणत्याही प्रकारची निंदा करणारी, अश्लील किंवा अभद्र भाषा वापरू नका. देशाविरुद्ध किंवा राजकीय मत व्यक्त करणारे पोस्ट टाळा. तसेच, #हॅशटॅग (#Tag) वापरताना त्यांचं बारकाईने परीक्षण करा. काही हॅशटॅग्स इंस्टाग्रामवर प्रतिबंधित (#Tag Banned On Instagram) असू शकतात. म्हणून त्यांचा वापर करू नका.
तुमच्या अकाउंटच्या सुरक्षेसाठी काही खास टिप्स:

1. गोपनीयतेचे पालन करा:
तुमचं प्रोफाइल खाजगी (Private Profile) ठेवा आणि जास्त फॉलोअर (More Followers) किंवा लाइक्स (Likes) मिळवण्यासाठी फसवणूक करू नका.
2. स्पॅम किंवा बोट्सचा वापर करू नका:
सम्बंधित ख़बरें




जेव्हा तुम्ही फॉलोवर्स (Followers) किंवा लाइक्स वाढवण्यासाठी बोट्स (Bots) किंवा स्पॅम सर्व्हिसेस (Spam Service) चा वापर करता, तेव्हा तुम्ही इंस्टाग्रामच्या नियमांचं उल्लंघन (Violation of Instagram Rules) करता.
3. अशुद्ध माहिती शेअर करू नका:
कोणत्याही खोट्या माहितीला शेअर करणं, किंवा कुठल्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणं हे तुमचं अकाउंट बॅन करू शकतं.
तुमचं इंस्टाग्राम अकाउंट बंद झालं तर काय कराल?

जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट बॅन (Instagram Account Ban) झालं असेल, तर तुम्ही ते पुन्हा सुरू करण्यासाठी काही साधे उपाय करू शकता. सर्वप्रथम, इंस्टाग्राम ओपन करा आणि सेटिंग्ज मध्ये जा. नंतर ‘Help Center‘ मध्ये जाऊन ‘My Instagram Account Has Been Disabled’ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचं अकाउंट पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तपशिलांचा उल्लेख करा, जसे की तुमचं यूझरनेम (Username), ईमेल आयडी (Email ID) आणि फोन नंबर (Phone Number) बंद होण्याचं कारण निवडा आणि माहिती सबमिट करा. काही दिवसांत तुमचं अकाउंट पुनः सक्रिय होईल.