Thalapathy Vijay Assets Election Affidavit | थलपती विजयची एकूण संपत्ती समोर; निवडणूक प्रतिज्ञापत्रातील कोट्यवधींच्या मालमत्तेचा खुलासा!

Thalapathy Vijay Assets Election Affidavit

Thalapathy Vijay Assets Election Affidavit | तामिळनाडूच्या राजकारणात आपल्या ‘तमिलगा वेट्टी कजगम’ (TVK) या पक्षाद्वारे ऐतिहासिक विजय मिळवणारा सुपरस्टार थलपती विजय (Superstar Thalapathy Vijay) सध्या चांगलाच चर्चेत आहे. निवडणुकीतील या अभूतपूर्व यशानंतर आता विजयच्या संपत्तीची आकडेवारी समोर आली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, थलपती विजय ६०० कोटींहून अधिक संपत्तीचा () मालक आहे. विशेष म्हणजे, विजयपेक्षा त्याची पत्नी संगीता सोर्णलिंगम हिच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने अधिक प्रमाणात आहेत.

विजयची सोन्याची गुंतवणूक

निवडणूक शपथपत्रानुसार, थलपती विजयकडे स्वतःचे १.२० कोटी रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने आहेत. यामध्ये अंदाजे ८८३ ग्रॅम सोन्याचा समावेश असून, ज्याची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक आहे. याशिवाय त्याच्याकडे १५ लाख रुपये किमतीची चांदी आहे. ६०० कोटींच्या अफाट संपत्तीचा मालक असूनही विजयने दागिन्यांमध्ये केलेली गुंतवणूक त्याच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत मोजकीच असल्याचे दिसते.

पत्नी संगीताकडे दागिन्यांचा मोठा वाटा

दुसरीकडे, विजयची पत्नी संगीता सोर्णलिंगम हिच्याकडे असलेल्या दागिन्यांची संख्या मोठी आहे. संगीताकडे ३.१ किलो सोने असून त्याची बाजारपेठेत किंमत सुमारे ४.०७ कोटी रुपये आहे. म्हणजेच पती विजयच्या तुलनेत संगीताकडे जवळपास चारपट अधिक सोने आहे. सोन्यासोबतच तिच्याकडे ४.७५ लाख रुपये किमतीची दोन किलो चांदी देखील आहे.

हिऱ्यांची चमक आणि कोट्यवधींचा खजिना

केवळ सोने-चांदीच नाही, तर संगीताकडे मौल्यवान रत्नांचाही मोठा साठा आहे. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, तिच्याकडे १३४.९१ कॅरेटचे हिरे आहेत, ज्यांचे बाजारमूल्य १ कोटी रुपयांच्या आसपास आहे. विजयच्या कुटुंबातील दागदागिन्यांचा मोठा हिस्सा हा त्याच्या पत्नीच्या नावे असल्याचे या कागदपत्रांवरून स्पष्ट होते.

वैयक्तिक आयुष्यात वादळ

एकीकडे थलपती विजयने राजकारणात यशाचे शिखर गाठले असले, तरी त्याचे वैयक्तिक आयुष्य सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. त्याची पत्नी संगीता हिने फेब्रुवारी महिन्यात कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्या २५ वर्षांच्या संसारानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर विजयच्या संपत्तीची ही माहिती आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

इतकी कौटुंबिक आव्हाने समोर असूनही, विजयच्या पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवत एक नवा इतिहास रचला आहे. आता अभिनेता ते यशस्वी राजकारणी असा प्रवास करणारा विजय तामिळनाडूच्या भविष्यात कोणती भूमिका बजावतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

WhatsApp Icon Telegram Icon