Iran Usa War Tension | जागतिक राजकारणात सध्या पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमा होऊ लागले आहेत. ‘Strait of Hormuz Tension’ (होर्मूजची सामुद्रधुनी) या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गावरून अमेरिका आणि इराणमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने हा मार्ग व्यापारी जहाजांसाठी खुला करण्याची घोषणा केली होती, मात्र अमेरिकेने जोपर्यंत ठोस करार किंवा ‘डील’ फायनल होत नाही, तोपर्यंत नाकेबंदी मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या इराणने हा मार्ग जगासाठी पुन्हा एकदा बंद करण्याची घोषणा केली असून, यामुळे परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.
काय आहे अमेरिकेची मोठी कारवाई?
इराणसोबतचा तणाव पाहता अमेरिकेने केवळ शाब्दिक इशारा न देता थेट प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड नौदलाने (The U.S. Central Command Navy) दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिलपासून या भागात कडक नाकेबंदी करण्यात आली आहे. आतापर्यंत इराणच्या तब्बल 31 जहाजांना अमेरिकन नौदलाने अडवले असून त्यांना समुद्रातूनच ‘युटर्न’ घेण्यास भाग पाडले आहे. यामुळे होर्मूजच्या सामुद्रधुनीमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले असून जगाची धाकधूक वाढली आहे.
अमेरिकेचे अवाढव्य सैन्यबळ तैनात | Iran Usa War Tension
या नाकेबंदीसाठी अमेरिकेने आपली मोठी ताकद पणाला लावली आहे. सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये अमेरिकेचे 10,000 पेक्षा जास्त सैनिक तैनात आहेत. त्यांना साथ देण्यासाठी 100 हून अधिक अत्याधुनिक फायटर जेट्स आणि 17 बलाढ्य युद्धनौका समुद्रात उतरवण्यात आल्या आहेत. एवढेच नाही, तर एअरक्राफ्ट कॅरिअर, मिसाइल डिस्ट्रॉयर आणि अनेक देखरेख करणारे ड्रोन देखील या भागात सतत घस्त घालत आहेत. अमेरिकेची ही तयारी पाहता, इराणवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
चर्चेची दुसरी फेरी आणि ट्रम्प यांची भूमिका
सम्बंधित ख़बरें
या वादावर पडदा टाकण्यासाठी शुक्रवारी अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेद्वारे तोडगा काढण्यासाठी आपले शिष्टमंडळ पाठवण्यास उत्सुक आहेत. मात्र, इराणकडून अद्याप या चर्चेबाबत कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेले नाही. इराणच्या निर्णयावरच आता या युद्धासारख्या स्थितीचे भवितव्य अवलंबून आहे.
जगावर इंधन संकटाची टांगती तलवार |
Strait of Hormuz हा जगातील कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. जर इराण आणि अमेरिकेतील हा तणाव निवळला नाही, तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होऊन इंधनाचे दर गगनाला भिडू शकतात. तज्ज्ञांच्या मते, जर चर्चेची दुसरी फेरी यशस्वी झाली, तर 30 जून पर्यंत हा मार्ग पुन्हा सुरळीत सुरू होऊ शकतो. अन्यथा, संपूर्ण जगाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.
हे पण वाचा: होर्मुजच्या समुद्रात भारतीय जहाजांवर इराणी गनबोट्सचा हल्ला; भारत आक्रमक, इराणच्या राजदूतांना बजावले समन्स
हे पण वाचा: जगाचे लक्ष युद्धाकडे, भारताचा मात्र मोठा डाव! दक्षिण कोरियासोबत ऐतिहासिक करार, व्यापार होणार दुप्पट
हे पण वाचा: इराणच्या गोळीबाराला न जुमानता भारताचे ‘देश गरिमा’ जहाज मुंबईकडे रवाना; जगाला चकित करणारी ऐतिहासिक कामगिरी!