NEET Scam Shivraj Motegaonkar | शिवराज मोटेगावकरला आणखी एक मोठा दणका | अनधिकृत बांधकामावर चालणार प्रशासनाचा हातोडा?

NEET Scam Shivraj Motegaonkar Unauthorized Construction Action

NEET Scam Shivraj Motegaonkar | देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या प्रसिद्ध आरसीसी (RCC) रेणुकाई करिअर सेंटर कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सीबीआयच्या अटकेनंतर आता मोटेगावकर यांना प्रशासनाकडूनही मोठा दणका मिळाला आहे. लातूर येथील त्यांच्या एका मोठ्या अनधिकृत बांधकामावर प्रशासनाचा हातोडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात मोटेगावकर यांच्या इमारतीला नोटीस बजावली असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवराज मोटेगावकर यांनी मेडिकल कॉलेज किंवा मोठ्या शैक्षणिक संकुलासाठी लातूरजवळील खोपेगाव शिवारात एक भव्य इमारत उभारली आहे. मात्र, ही इमारत उभारताना कोणतीही कायदेशीर मंजुरी किंवा बांधकाम परवाना घेतला नसल्याचे आता उघडकीस आले आहे. विनापरवाना आणि पूर्णपणे अनधिकृतपणे हे साम्राज्य उभे केल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. प्रशासनाने मोटेगावकर यांना नोटीस पाठवून या बांधकामाशी संबंधित सर्व परवाने आणि आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. योग्य कागदपत्रे न मिळाल्यास हे बेकायदेशीर बांधकाम पाडले जाण्याची दाट शक्यता आहे.

कोचिंग कट्ट्यावरून थेट सीबीआयच्या कोठडीत

लातूरमध्ये विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी वसूल करत शिवराज मोटेगावकर यांनी आरसीसी कोचिंग क्लासेसचे (RCC Coaching Classes) एक मोठे साम्राज्य उभे केले होते. लातूर पॅटर्नच्या (Latur Pattern) नावाखाली हजारो विद्यार्थी त्यांच्याकडे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी येत असत. मात्र, नीट पेपर फुटीच्या महाघोटाळ्यात (NEET Paper Leak Scam 2026) नाव आल्यानंतर त्यांचे हे साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखे कोलमडले आहे. या प्रकरणात सखोल तपास केल्यानंतर सीबीआयने (CBI) मोटेगावकर यांना अटक केली असून, सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

NEET Scam Shivraj Motegaonkar
NEET Scam Shivraj Motegaonkar Unauthorized Construction Action

या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. लातूरमधीलच जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि प्राध्यापक जलील उमरखान पठाण आणि संजय तुकाराम जाधव यांच्या अटकेनंतर या घोटाळ्यात प्राध्यापक कुलकर्णी आणि त्यानंतर थेट शिवराज मोटेगावकर यांचे कनेक्शन समोर आले होते. मोटेगावकर यांच्या अटकेमुळे लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात विविध संघटनांकडून तीव्र आंदोलने केली जात आहेत.

संशयित विद्यार्थी आणि पालकही सीबीआयच्या रडारवर

मोटेगावकर यांच्या अटकेनंतर आता सीबीआयने (CBI) आपला मोर्चा त्यांच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडे वळवला आहे. मोटेगावकर यांच्या माध्यमातून ‘नीट’ परीक्षेचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे ज्या विद्यार्थ्यांना आधीच मिळाली होती, अशा संशयित विद्यार्थ्यांची यादी सीबीआयने तयार केली आहे. हे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या सीबीआयच्या रडारवर असून, त्यांचीही चौकशी केली जात आहे. कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार करून हा पेपर मिळवण्यात आला होता, असा संशय यंत्रणेला आहे.

या पेपर फुटीच्या घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्येही पसरले आहेत. लातूर पाठोपाठ आता पुणे कनेक्शनही समोर आले आहे. पुणे येथून सीबीआयने अकरावी आरोपी म्हणून प्राध्यापिका मनीषा हवालदार यांना अटक (Eleventh Accused, Professor Manisha Hawaldar, Arrested) केली आहे. मनीषा हवालदार या लातूरच्या आरोपींच्या संपर्कात होत्या आणि त्यांनी पेपर फुटीच्या व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

एकीकडे सीबीआयचा कायदेशीर फास आवळला जात असतानाच, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मोटेगावकर यांच्या अनधिकृत संपत्तीवर आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईचे अस्त्र उपसले आहे. ( Motegaonkar Unauthorized Construction Action) त्यामुळे केवळ नीट पेपर फुटीच्या गुन्ह्यातच नाही, तर अनधिकृतपणे उभारलेले शैक्षणिक साम्राज्य गमावण्याची वेळ आता शिवराज मोटेगावकर यांच्यावर आली आहे. या कारवाईमुळे लातूरमधील शिक्षण माफियांचे धाबे दणाणले आहेत.

WhatsApp Icon Telegram Icon