क्राईममहाराष्ट्र

Pune Naushad Shaikh Creative Academy Crime | 58 वर्षाच्या क्रिएटिव्ह अकॅडमी शाळेच्या संचालकाचे शिक्षणाच्या नावाखाली लैंगिक अत्याचार

पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नौशाद शेख विरोधात भाजपसह हिंदू संघटना एकवटल्या आहेत

Pune Naushad Shaikh Creative Academy Crime : 2021 साली यवतमाळ जिल्ह्यातील एक सेमिनार झाला सेमिनार घेणाऱ्यांने सांगितलं की त्याची पुण्यात शाळा आहे. मुलांना चांगलं शिक्षण मिळेल त्यांचं करिअर घडेल असं बरंच काही सांगितलं. त्याच्या बोलण्याचा प्रभाव एका मुलीच्या वडिलांवर पडला. आपल्या मुलींना उच्च शिक्षण घ्यावं, पुण्यासारख्या ठिकाणी शिकून करिअर घडवावं असं त्या, वडिलांना वाटणं स्वाभाविक होतं. या शाळेतच राहायची सोय होती, पण फीस चा खर्च जाणार होता 2 लाख 26 हजार रुपयांवर आपल्या मुलीला कसली कमतरता राहायला नको म्हणून या बापाने पैशांची जुळवा जुळव केली.

आई-वडिलांनी मिळून मुलीच्या उज्वल भविष्याचा स्वप्न पाहिलं पण त्यांच्या दुर्दैवानं त्यांची मुलगी एका वासानेच्या सापळ्यात अडकली ती आहे. क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. कारण याच्याच बोलण्यावर त्याने दाखवलेल्या मुलांच्या भविष्याबद्दलच्या स्वप्नांवर विश्वास ठेऊन पालकांनी त्याच्या शाळेत आपल्या मुलीला घातलं, आणि नौशादन तिला वासनाची शिकार बनवलं सध्या अटकेत असलेल्या नौशादला कठोर शिक्षा व्हावी, आणि त्याच्या मालमत्तां वर बुल्डोजर चालवावा अशी मागणी आमदार महेश लांडगे आणि सामाजिक संघटनांनी केली आहे पण नवशात शेख सह हे प्रकरण नेमकं काय आहे. 2014 मध्ये त्याचं नाव चर्चेत का आलं होतं तर संपूर्ण प्रकरण काय आहे,ते आपण माहीत करून घेण्यासाठी शेवट पर्यंत हा लेख वाचा.

पीडित मुलीचा विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न

पुण्याजवळच्या आकुर्डीत रावेत कॉर्नर इथे क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाने एक निवासी शाळा आहे. 58 वर्षांचा नौशाद शेख होय शाळा चालवतो या शाळेत आठवी ते बारावीच्या मुलांना सीबीएससी बोर्डा अंतर्गत शिक्षण दिले जाते. या शाळेच्या हॉस्टेलमध्ये सध्या 75 मुली आणि शंभर पेक्षा जास्त मुलं शिकतात. शाळेत मुलांना भरती करण्यासाठी नौशाद शेख राज्यभर फिरून शाळेची माहिती सांगणारे सेमिनार घेत होता. नाशिक अहमदनगर विदर्भ मराठवाडा राज्याच्या कानाकोपर्‍यातून पालक आपल्या मुलांचं या शाळेत ऍडमिशन करत होते, ते सुद्धा जवळपास 2.50 लाख रुपये खर्च करून यवतमाळ मधल्या मुलीचे पालक अशा सेमिनारच्या अनुशाला भुलले.

त्यांची मुलगी नौशादच्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये दाखल झाली असता मुलींच्या हॉस्टेलमध्ये मुलांना किंवा पुरुषांना जायला बंदी असताना हॉस्टेलचा संचालक नौशाद शेख पहिल्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहत होता. 2022 मध्ये पीडित मुलगी नववीत शिकत असताना नौशाद यांच्याकडे  तिला त्याच्या फ्लॅटवर बोलावलं तिचा विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण तिने प्रतिकार करत कसाबसा पळ काढला मुलगी आपला ऐकत नाही यामुळे संतापलेल्या नौशादन तिला रोज त्रास द्यायला सुरुवात केली.

Pune Naushad Shaikh Creative Academy Crime

दुसर्‍या मुलीसमोर पीडित मुलीवर अश्लील शेरेबाजी

जर तु माझा ऐकलं नाहीस तर तुझ्या घरच्यांना फोन करेल, तुझे इथल्या मुलांसोबत संबंध असल्याचे सांगेन अशी, धमकी नौशाद वारंवार पिडीत मुलीला देत होता. त्यानंतर 2022 मध्येच दिवाळीच्या सुट्टीत तुला उठणं लावून आंघोळ घालतो, असं म्हणत नौशाद ने तिचा विनयभंग केला. तेव्हाही मुलीने त्याला विरोध केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नौशादने त्यावेळी बारावीत शिकत असलेल्या रागिनी पाटील या मुलीसमोर पीडित मुलीवर अश्लील शेरेबाजी केली मुलगी आपला ऐकत नसल्याचा नौशाद ने रागिनी ला सांगितलं. 

शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मुलीनेच-मुलीवर दबाव आणला 

त्यावेळी बारावीतली मुलगी रागिनी ने नौशाद सोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पीडित मुलीवर दबाव आणला. या सगळ्या प्रकारामुळे मुलगी घाबरली पण ती आपल्या आई-वडिलांना हे सांगू शकत नव्हती, कारण ही निवासी शाळा म्हणजे एक प्रकारची नजर कैद होती. या शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुला-मुलींना मोबाईल वापरायला बंदी होती. आपल्या पालकांसोबत बोलणं तर सोडाच त्यांना घरच्यांना भेटण्यासाठी महिन्यातून एकदाच वेळ येत होती.

हॉस्टेलच्या गेटवर सुरक्षा रक्षकांची फौज तैनात करण्यात यायची, हे सुरक्षारक्षक आधी पालकांची चौकशी करायचे होस्टेलच्या सुपरवायझर कडून परमिशन घ्यायचे. मगच पालकांना मुलांना भेटण्याची परवानगी दिली जायची, तेही होस्टेलच्या मेस मध्ये सुरक्षारक्षकांच्या पहार्यात पाच ते दहा मिनिटांसाठी शाळेचा संचालक नौशाद शेख ला भेटायचं असेल तर आधी परवानगी घ्यावी लागायची. मुलांचा पालकांशी जास्त वेळ संपर्क होऊ नये याची पूर्ण काळजी नौशाद शेख घ्यायचा. होस्टेलचे नियम कडकच असतात असं समजून पालकही याकडे दुर्लक्ष करायचे. पण याचाच फायदा नौशाद आपल्या वासनेची शिकार बनवायला घेत होता.

भीतीमुळे पिडीत मुलगी तब्बल दीड वर्ष अत्याचार सहन करत राहीली

नोव्हेंबर 2022 मध्ये नौशाद शेख ने पुन्हा एकदा पीडित मुलीला हॉस्टेल मधल्या फ्लॅटवर बोलावलं. “मी तुला Physically involved होऊन develop करेन तुझं करिअर बनवेल फक्त तू माझं ऐक आणि माझ्यासोबत रिलेशन मध्ये राहा” असं सांगत नौशादन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलींना याबाबत कोणालाही सांगू नये म्हणून अनेक मुलींचे त्याच्याबरोबर असलेले असतील फोटो आणि व्हिडिओ त्याने तिला दाखवले.

नंतर नौशाद वारंवार पीडित मुलीवर अत्याचार करत राहिला. आपली आणि आपल्या आई वडिलांची बदनामी होईल. या भीतीने मुलगी तब्बल दीड वर्ष हे अत्याचार सहन करत राहीली. या दडपणाखाली पिढीत मुलगी दहावीची परीक्षा पास झाली. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिला अकरावी सायन्स साठी याच क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेऊन दिलं पण दोन वर्ष शांत बसून आपल्यावर होणारे अत्याचार सहन करणाऱ्या पिढीत मुलीनं त्यावेळी आपल्याला इथे शिक्षण घ्यायचं नाही, मला इथून घेऊन चला असा पीडित मुलगी तिच्या वडिलांना म्हणाली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गाठलं

ऑगस्ट 2023 मध्ये मुलीचे वडील तिला घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर मुलगी घरात कोणाशीच न बोलता कोपऱ्यात गप्प बसून जायची. इथं का शिकायचं नाही याच उत्तर द्यायची नाही आई-वडिलांना तिच्या या वागण्याच कारण कळत नव्हतं पिडीत मुलगी भीतीपोटी काहीच सांगत नव्हती. याचवेळी पीडित मुलगी क्रिएटिव अकॅडमीच्या काही माजी विद्यार्थिनींशी मोबाईलवर बोलायची. परदेशात असलेल्या एका माजी विद्यार्थिनी ने तिला सांगितलं “मी सुद्धा हे सगळं सहन केलेलं आहे. मी घाबरून कुणाला काही सांगितलं नाही पण तू आई-वडिलांना हा सर्व प्रकार सांग म्हणजे तुला न्याय मिळेल, यापुढे कुठल्याही मुलीबरोबर असं घडणार नाही”.

11 जानेवारी 2024 ला या मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते ते रात्री उशिरा परत आले तेव्हा पिढीत मुलगी जागीच होती इतक्या उशिरापर्यंत जागी का आहे तसं विचारल्यावर तिने रडत रडत तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला हे सगळं ऐकून त्यांना मोठा धक्का बसला. धक्क्यातून काहीसे सावरल्यानंतर त्यांनी 30 जानेवारीला मुली सोबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गाठलं. मुलीने या बाबत घडलेला घ्रनास्पद प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करत क्रिएटिव्ह अकॅडमी चा संचालक नौशाद शेख आणि त्याला मदत करणाऱ्या माजी विद्यार्थिनी रागिनी पाटील ला अटक करण्यात आली.

हॉस्टेलमधल्या इतर मुलींची चौकशी

रागिनी पाटील सध्या पुण्यातल्या एका संशोधन संस्थेत सहशास्त्रज्ञ म्हणून काम करते या दोघांच्या अटके नंतर नौशाद ने अनेक मुलींवर अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे तक्रारीनंतर शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एका महिला अधिकाऱ्याची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे या अधिकाऱ्यांमार्फत हॉस्टेलमधल्या इतर मुलींची ही चौकशी केली जाते मुलींचा समुपदेशन करून असं काही घडलं आहे का याची माहिती घेऊन नराधम नौशादला जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले राजकीय पक्ष आणि काही हिंदुत्ववादी संघटना याप्रकरणी आक्रमक झाल्या आहेत.

Pune Naushad Shaikh Creative Academy Crime

भाजपचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आक्रमक

भाजपचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी आक्रमक पवित्रा घेत नौशादच्या घरावर बुल्डोजर चालवून महाराष्ट्रात सुद्धा योगी पॅटर्न लागू करण्याची गरज असल्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी केली आहे. सरकारनं कारवाई केली नाही तर आम्हीच बुल्डोजर चालऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्य म्हणजे दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये सुद्धा नौशाद वर असाच एक गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीने तक्रार केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

तेव्हा फरार झालेल्या नौशादला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली पण त्यावेळी तो राजकीय हस्तक्षेपामुळे सुटला होता. असं सांगण्यात येतं आहे. सध्याची घटना उघडकीस आल्यानंतर क्रिएटिव्ह अकॅडमी मध्ये शिकत असलेल्या इतर मुला-मुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशन आणि हॉस्टेलच्या आवारात गर्दी करायला सुरुवात केली आहे.

क्रिएटिव्ह अकॅडमीला निवासी शाळेची परवानगीच नाही

सध्या या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या विद्यार्थ्यांसोबत होस्टेलमध्ये राहण्याची किंवा आपापल्या घरी घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात अजून एक धक्कादायक माहिती समोर येते ती म्हणजे क्रिएटिव्ह अकॅडमीला निवासी शाळेची परवानगीच नाही. तसंच क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नावानं चालवण्यात येत असलेल्या शाळेकडे सीबीएससी बोर्डाची एनओसी सुद्धा बनावट असल्याची माहिती मिळते 14 जुलै 2022 ला शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत यांनी बनावट एनओसी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नाही अखेर या घटनेमुळे हा सगळा प्रकार बाहेर आला आहे.

शाळेला टाळ लावून परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येते. थोडक्यात हॉस्टेलची आणि शाळेची परवानगी नसतानाही 58 वर्षांचा नौशाद शेख कित्येक विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक करून अल्पवयीन मुलींना आपल्या विकृतीला बळी पाडत होता दहा वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचार प्रकरणात नौशादला अटक होऊ नये. तो  जामीनावर सुटत राहिला पण त्याच वेळी जर त्याला कठोर शिक्षा झाली असती तर गेल्या दहा वर्षात अनेक अल्पवयीन मुली त्याच्यापासून बचावल्या असत्या. ज्या शाळेत भविष्य घडतं त्याच शाळेच्या संचालकानं अनेक मुलींचा आयुष्य उध्वस्त केलं आणि कित्येक पालकांच्या स्वतःची राख रांगोळी केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button