Suryakumar Yadav Catch Controversy : सुर्यकुमारच्या कॅच वरुण वाद | फोटो आणि व्हिडिओ दिसणारी बॉण्ड्री लाईन केव्हाची होती जाणून घ्या
Suryakumar Yadav Catch Controversy : सूर्यकुमार यादव ने सीमारेषेवर डेव्हिड मिलर ची अप्रतिम कॅच पकडली आणि तिथेच सामना भारताने जिंकल्यात जमा झाला. टी – ट्वेन्टी विश्वचषकाच्या सामान्यत भारताने दक्षिण आफ्रिके विरुद्ध सात धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामान्यात सूर्यकुमार यादवच्या एका झेलमुळे भारताचा विजय सोपा झाला या नंतर सूर्यकुमार यादवचे कौतुक केले जात आहे. मात्र सूर्यकुमार ने घेतलेल्या झेल वरून वाद देखील निर्माण झाला आहे. सूर्यकुमार यादव च्या या झेलबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत.
यामध्ये सूर्यकुमार ने जेव्हा झेल घेतला होता, तेव्हा त्याचा एक पाय सीमारेषेला लागला होता असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. तसेच सूर्यकुमार यादवनी झेल घेतला त्या ठिकाणची बॉण्ड्री लाईन मागे घेतल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. सूर्यकुमार यादवने झेल घेतला तेव्हा बॉण्ड्री लाईन मागे घेतल्याचे दिसून येत आहे. यावेळी पांढऱ्या रंगाची पट्टी व्हिडिओ आणि फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
मात्र ही लाईन गेल्या सामान्यातील होती. गेल्या सामन्यात पांढऱ्या कलरच्या दिसणाऱ्या लाईनवर बॉण्ड्री ठेवण्यात आली होती. त्यावेळी खेळपट्टी देखील वेगळी होती. मात्र अंतिम सामन्याच्या खेळपट्टी नुसार बॉण्ड्री लाईन मागे घेण्यात आली होती.
सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
सोशल मीडियावर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की त्या दिवशी वेगळीच फील्डिंग लागली होती कारण रोहित शर्मा कधी लॉंग – ऑन वर उभा राहत नाही परंतु त्यावेळी तो तिथे होता जेव्हा चेंडू माझ्या दिशेने येत होता तेव्हा तिकडे धावताना मी सर्वात आधी रोहित कडे पाहिले मला चेंडू पकडायचा तर होता परंतु रोहित जवळ असता तर त्याच्याकडेच मी तो फेकला असता पण तो जवळ नव्हता यानंतर डोक्यात चक्र फिरले आणि मी मैदाना बाहेर जाऊन परत झेल घेण्यासाठी उपाय शोधला. असे सूर्यकुमार यादवने संवाद साधताना सांगितले आहे.
सूर्यकुमार यादवने झेल घेत सामान्यला दिली कलाटणी
बारबाडोस येथे खेळल्या गेलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक 2024 च्या रोहित शर्माने नाणेफेक जिंकण्यापूर्वी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या शानदार 76 धावा आणि अक्षर पटेल च्या शानदार 47 धावांच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात सात गडी गमावून 176 धावा केल्या.
Forever a Suryakumar yadav (goatyakumar goatav ) for this world cup winning catch pic.twitter.com/wr2j59pWuO
— MainHoonShiv (@samosa_aaloo) June 29, 2024
Suryakumar Yadav Catch Controversy
याला प्रत्युत्तर म्हणून लक्ष्याचे पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले यानंतर हेनरी क्लासने आणि डेव्हिड मिलर यांनी शानदार फलंदाजी करत टीम इंडियाकडून सामना जवळपास हिसकावून घेतला होता. मात्र हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत हेनरी क्लासेनला झेलबाद केले.
पण डेबिड मिलर अजूनही क्रिजवर होता. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती डेविड मिलर स्ट्राइक वर होता यावेळी डेव्हीड मिलरने हार्दिक पंड्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला, जवळपास मिलर यशस्वी देखील झाला. तरीसुद्धा सूर्यकुमार यादव याने सीमा रेषेपर्यंत धावत चेंडूचा झेल घेतला.
मग काय तो सीमारेषेला स्पर्श करणार होता. त्यामुळे त्याने चेंडू हवेत फेकला आणि नंतर सीमारेषेत प्रवेश केला आणि हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. जर त्याला झेल एवजी षटकार मिळाला असता. आणि टीम इंडियाचे विजयी होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले असते.
पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित
अंतिम सामन्यात सीमारेषा मागे सरकवण्यात आल्यावर पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे चित्र त्याच सीमारेषेचे आहे जिथे सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल घेतला होता. बीसीसीआयने आपली ताकद वापरून सीमारेषेचा दोर मागे ढकलला, त्यामुळे डेव्हिड मिलर झेलबाद झाला आणि चेंडू षटकारापर्यंत गेला नाही, असा आरोप केला जात आहे. जर सीमारेषा सामान्य स्थितीत असती तर सूर्यकुमार यादवला झेल पूर्ण करता आला नसता.