आरोग्य व शिक्षण

Shreyas Talpade Heart Attack | Angioplasty | नंतर आरोग्य स्थिर, एवढ्या कमी वयात हार्ट अटॅक येण्याचे कारण काय?

2015 मध्ये अकाली मृत्यूच्या कारणांपैकी हृदयाशी संबंधित आजार तिसऱ्या क्रमांकाचे कारण होतं मात्र गेल्या वर्षात 2016 मध्ये हृदयाशी संबंधित व्याधी हे अकाली मृत्यूचे मुख्य कारण ठरू लागलं.

Shreyas Talpade Heart Attack | Angioplasty : अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबरच्या रात्री दहाच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता, वेलकम टू द जंगल (Welcome to the jungle) या सिनेमाच्या शूटिंग नंतर त्याला छातीत दुखू लागल्याने श्रेयस तळपदेला तातडीने मुंबईच्या अंधेरी स्थित Belle-Vue (Multispeciality Hospital) या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं, इथे Dr. Vijay N. Lulla यांनी त्याच्यावर एनजीओप्लास्टीची (NGOPLASTY) शस्त्रक्रिया केली अशी माहिती श्रेयस तळपदेच्या टीमने Social Media  वरती सांगितली आहे. मात्र 47 वर्षांच्या श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक का आला. असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जातोय त्याची प्रकृती सध्या स्थिर सांगितली जाते पण गेल्या काही काळात कमी वयातच तरुण आणि मध्यम फिट व्यक्तींमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळते असं का होतं आणि हे थांबवण्यासाठी काय करायला हवं तर मित्रांनो यासाठी सविस्तर माहिती पूर्ण वाचा.

53% लोकांनी हार्ट अटॅक मुळे जीव गमावला.

अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार 2015 पर्यंतच्या आकडेवारीत भारतात सहा पूर्णांक (Integer) दोन कोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत, यापैकी दोन पूर्णांक तीन कोटी लोक 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, म्हणजेच हृदयविकाराच्या 40% रुग्णांनी वयाची 40 शी सुद्धा पार केली नाही, भारतीयांसाठी हे आकडे धोक्याची बाब आहे. जाणकारांच्या मते भारतीय तरुणांमध्ये हार्ट अटॅकच प्रमाण झपाट्याने वाढतंय healthdata.org या वेबसाईट नुसार जगभरात ही हार्ट अटॅक ने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे 2016 या वर्षात विविध कारणांनी होणाऱ्या मृत्यूंचा अभ्यास करण्यात आला तर त्यापैकी 53% लोकांनी हार्ट अटॅक मुळे जीव गमावल्याचे दिसून येत आहे.

हृदयाशी संबंधित आजार तिसऱ्या क्रमांकाचे कारण.

तसंच 2015 मध्ये अकाली मृत्यूच्या कारणांपैकी हृदयाशी संबंधित आजार तिसऱ्या क्रमांकाचे कारण होतं मात्र गेल्या वर्षात 2016 मध्ये हृदयाशी संबंधित व्याधी हे अकाली मृत्यूचे मुख्य कारण ठरू लागलं 10-15 वर्षांपूर्वी हृदयविकार किंवा तत्सम आजार हे म्हाताऱ्यांनाच होतात असं मानलं जायचं मात्र गेल्या दशकभरात हृदयाशी संबंधित विकारांचा वेगळे चित्र समोर येत चाललंय देशातले प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर एस सी मंचंदा यांच्या मते देशातल्या तरुणांचे हृदय खरंच कमकुवत होत चाललंय डॉक्टर मंचंदा सध्या दिल्ली स्थित गंगाराम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत याआधी ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या शाखेत प्रमुख होत्या. 

हार्ट अटॅकचे प्रमुख लक्षणे.

Shreyas Talpade Heart Attack | Angioplasty: हृदय कमकुवत होणे मागची पाच कारण ते सांगतात तणावपूर्ण आयुष्य खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा आणि सवयी बराच वेळ सतत कम्प्युटर आणि इतर गॅजेट सर काम करणं धूम्रपान तंबाखू किंवा दारूचे व्यसन असणं आणि वायू प्रदूषण हार्ट अटॅकचं प्रमुख लक्षण म्हणजे छातीत दुखणं मात्र आपल्या चित्रपटांमध्ये दाखवतात तसंच नेहमी होत असेल असं नाही म्हणजे छातीत दुखणारी व्यक्ती हात हृदयाशी घेऊन पिळवट ते वेदने मुळे तडफडते दुखणे सहन करण्यापलीकडे गेल्याने ती जमिनीवर कोसळते असंच नेहमी होतं असं नाही जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा होत नाही तेव्हा हार्ट अटॅक येतो साधारणतः धमन्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला की हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो या कारणामुळे छातीत प्रचंड दुखतं मात्र काही वेळेला छातीत दुखत नाही याला सायलेंट हार्ट अटॅकही म्हणतात हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणे काय तर छातीत दुखणं किंवा अस्वस्थ वाटण छातीतून हात जबडा मान पोट याकडे, जाणाऱ्या मार्गात दुखणं मन अस्वस्थ होणं चक्कर येणं प्रचंड घाम येणं श्वास घेण्यात अडचण येणं उलटी सारखं वाटण खोकल्याची मोठी उबळ येणं जोरजोरात श्वास घेण्याची गरज पडते.

महिलांनी गर्भनिरोधक औषध घेतल्याने वाढतो हार्ट अटॅकचा धोका!

महिला जेष्ठ नागरिकांनी डायबिटीज असलेल्यांना छातीत प्रचंड दुखत नाही मात्र तरीही तो हार्ट अटॅक असू शकतो. तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर केके अग्रवाल यांच्यानुसार स्त्रियांना रजोनिवृत्ती (Menopause) पूर्वी हार्ट अटॅक ची शक्यता कमी असते. स्त्रियांच्या शरीरात श्रवणणाऱ्या हार्मोन्समुळे हार्ट अटॅकची शक्यता कमी होते मात्र गेल्या काही वर्षांमध्ये रजोनिवृत्ती (Menopause)  पूर्वीच्या वयात ही स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलंय Public Health Foundation च्या डॉक्टर श्रीनाथ रेड्डी यांच्या मते स्त्रिया धूम्रपान करत असतील गर्भनिरोधक औषधांचा सातत्याने सेवन करत असतील तर हार्ट अटॅक ची शक्यता वाढते नंतर पाच वर्षानंतरही स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता पुरुषांच्या बरोबरीने असते असं त्या सांगतात स्त्रिया छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना होणाऱ्या हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार होण्यास वेळ लागतो. 

हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी काय करावे ?

हार्ट अटॅक टाळायला नेमकं काय करायला हवं तरुणांनी आपल्या जीवनशैलीत (lifestyle) थोडीशीच आवश्यक आहे असं डॉक्टर मन चंदा सांगतात योग केल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो योग केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते मन एकाग्र होण्यास फायदा होतो असंही डॉक्टर सांगतात हार्ट अटॅक पासून वाचायचं असेल तर Trans fat ला दूर ठेवावं असं डॉक्टर मनचंदा सांगतात डॉक्टर माणसांना यांच्या मते जसा कर (tax) सरकारने तंबाखू आणि सिगरेटवर लादला आहे तसाच कर Junk foods वर सुद्धा आकारायला हवा तसंच जंक पुढच्या पॅकेटवरही सिगारेटच्या पाकिटावर असतो तसा ठळक अक्षरात इशारा लिहायला हवा हे केल्याने हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होणार नाही पण किमान जागरूकता वाढेल.

निष्कर्ष:-हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांच्या महत्त्वावर भर दिला पाहिजे. धूम्रपान, तणाव आणि अस्वास्थ्यकर आहार हे हृदयरोगाचे प्रमुख जोखीम घटक आहेत. या ब्लॉगमधील सूचनांचे पालन करणे हे निरोगी जीवनाची पहिली पायरी असू शकते. तथापि, कोणतेही आरोग्यविषयक निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. हृदयरोग हा एक गंभीर आजार आहे आणि वेळेवर उपचार न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आशा आहे की हा ब्लॉग हृदयाच्या आरोग्याच्या प्रयत्नांना प्रेरणा देईल!

कृपया नोंद घ्याः या ब्लॉगचा वैद्यकीय सल्ला देण्याचा हेतू नाही.  कोणत्याही आरोग्य संबंधित प्रश्नांसाठी कृपया तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button