Bhiwandi Sanket Bhosle Murder | संकेत भोसले हत्या प्रकरण: बेदम मारहाण आणि मृत्यू: संकेत भोसले प्रकरणाचा उलगड
संकेतच्या कुटुंबीयांनी कैलास धोत्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अपहरण आणि हत्येचा आरोप केला आहे.
Bhiwandi Sanket Bhosle Murder : शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी उपशहर प्रमुख कैलास धोत्रे यांना पोलिसांनी अटक केली त्यांना अटक का झाली. त्याची चर्चा व्हायला लागली. तेव्हा सोबतच आणखी एक प्रकरण चर्चेत आलं, संकेत भोसले हत्या प्रकरण भिवंडीच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षांच्या संकेतचा 21 फेब्रुवारीला मृत्यू झाला. कारण ठरलं कॉलेज बाहेर झालेलं एक किरकोळ भांडण पण संकेत सोबत नेमकं काय घडलं त्याची हत्या का झाली? आणि या प्रकरणात कैलास धोत्रे यांचे नाव कसं पुढे आलं. पुढे याबद्दला आपण माहिती जाणून घेणार आहोत.
संकेत अकरावी आर्टला शिकत होता
भिवंडीतल्या वराळदेवी नगर परिसरात संकेत भोसले आपल्या कुटुंबासोबत राहायचा संकेतचे वडील सुनील भोसले रिक्षा चालवतात तीन भाऊ आणि एका बहिणींमध्ये संकेत सगळ्यात लहान संकेत भिवंडीच्या बी.एन.एन. कॉलेजमध्ये अकरावी आर्टला शिकत होता.
बाचाबाचीच रूपांतर हाणामारीत
14 फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे संकेत कॉलेजला गेला. दुपारी अडीचच्या सुमारास तो कॉलेज बाहेर मित्रांबरोबर गप्पा मारत उभा होता. त्यावेळी याच कॉलेजमध्ये अकरावी आर्टला शिकणारा देवा धोत्रे त्याचे मित्र सत्यम आणि शिवम कॉलेजच्या बाहेर आले या तिघांनी चायनीज खायचा प्लॅन केला पण यातला देवा मला घरी फोन करायचाय, “तुम्ही दोघं चायनीजच्या दुकानावर जा मी आलोच” असं सांगून दुसऱ्या दिशेला गेला रस्त्यावरून जात असताना संकेत आणि त्याच्या मित्रांचा देवाला धक्का लागला. त्यांच्यात थोडी बाचाबाची झाली. या बाचाबाचीच रूपांतर हाणामारीत झालं.
संकेत आणि देवा मधला वाद
मित्रांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर थोड्या वेळानं संकेत आणि देवा मधला हा वाद शांत झाला. संकेत आणि त्याचे मित्र तिथून निघून गेले. किरकोळ भांडण होतं, ते आता संपलंय असं त्यांना वाटलं पण त्यांचा हाच अंदाज खोटा ठरला. या भांडणाला तासभर झाला आणि दुपारी साडेतीन वाजता संकेत चे वडील सुनील भोसले यांना त्यांचा मोठा मुलगा संजय चा फोन आला. संकेत चे काही मुलांसोबत वाद झाले तुम्ही लगेच नारपोली पोलीस स्टेशनला या. असं संजयने आपल्या वडिलांना सांगितलं नारपोली पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर त्यांना संकेत बद्दल, धक्कादायक माहिती मिळाली दुपारी आठ दहा लोक संकेतला शिवीगाळ करत बाईकवरून कुठेतरी घेऊन चालले होते? असं त्यांच्या मित्रांना त्यांना सांगितलं संकेतचा देवासोबत वाद झाला होता. आणि देवा सध्या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचं त्यांना कळलं. आपल्या मुलासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं घडलंय, याचा संशय संकेत च्या वडिलांना आला. ते आपल्या शेजारी खंडू उबाळे यांच्यासोबत गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये देवाला भेटायला आणि संकेतची विचारपूस करायला गेले तिथे त्यांना देवा भेटला. त्यांना सांगितलं संकेत माझ्या डाव्या हातावर हल्ला करून कुठेतरी पळून गेलाय तिथे देवाचे कुटुंबीय होते.
संकेत चा भाऊ सुमितला पोलिसांचा फोन
संकेतच्या वडिलांनी त्यांच्याकडे आपला मुलगा कुठे आहे. याची चौकशी केली तेव्हा त्यांनी उरवा उरवीची उत्तर दिली. संकेत चे वडील टेन्शनमध्ये नारपोली पोलीस स्टेशनमध्ये परत आले. तेवढ्यात संकेत चा भाऊ सुमितला पोलिसांचा फोन आला. संकेतला दुखापत झाली आहे. त्याच्यावर भंडारी कंपाऊंड मधल्या लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. असं पोलिसांनी त्याला सांगितलं. संकेतच्या वडीलाना सांगितल्यास ते घाबरले त्यांनी लोटस हॉस्पिटल गाठलं पण, संकेतच्या डोक्याला जोरदार मार लागल्यामुळे त्याला जवळच्या रेनबो हॉस्पिटलला हलवण्यात आल्याच त्यांना सांगण्यात आलं.
संकेतचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू
तिथे गेल्यानंतर त्यांना दिसलेला दृश्य आदर होणार होत. हॉस्पिटल बाहेरच्या रीक्षेत त्यांचा मुलगा संकेत होता बेशुद्ध पडलेला आणि रक्तबंबा झालेला संकेतच्या डोक्यावर मानेवर छातीवर मारहाण झाल्याच्या जखमा आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला फ्रॅक्चर असल्यास डॉक्टरांनी सांगितलं. संकेतच्या डोक्याला झालेली जखम गंभीर असल्यामुळे त्याला के एम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू झाले पण जखमा इतक्या गंभीर होत्या की, संकेतचा उपचारादरम्यान 21 फेब्रुवारीला दुर्दैवी मृत्यू झाला.
शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी उपशहर प्रमुख कैलास धोत्रे यांचे नाव चर्चेत
पण जेव्हापासून संकेत गायब झाला तेव्हापासून शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी उपशहर प्रमुख कैलास धोत्रे यांचे नाव चर्चेत येत होतं. कारण ज्या देवा सोबत संकेत चा वाद झाला होता. तो देवा कैलास धोत्रेंचा मुलगा होता. कैलास धोत्रे आपल्या साथीदारांसोबत संकेतला बाईक वरून शिवीगाळ करत घेऊन जात असल्याचं संकेत च्या वडिलांच्या मित्रांन पाहिलं होतं त्यांनी संकेतच्या वडिलांना याबाबतची माहिती दिली. तेव्हा त्यांनी सांगितल संकेतला कुठे नेलं असा प्रश्न कैलास धोत्रेला केला. तेव्हा धोत्रेंनी उरवा उरवीची उत्तर दिली. त्यामुळे संकेतच्या कुटुंबीयांना कैलास धोत्रेंचा संशय आला.
सहा ते सात जणांवर संकेतच्या हत्ये बाबत गुन्हा
आपल्या मुलाशी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी कैलास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संकेतच अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप संकेत च्या वडिलांनी केला. त्यांनी लगेचच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांकडून कैलास धोत्रे, करण लष्कर, दिनेश मोरे, आकाश जाधव, चंदन ड्रायव्हर, अशा सहा ते सात जणांवर संकेतच्या हत्ये बाबत गुन्हा दाखल केला. त्यानंतर जोपर्यंत संकेत च्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आपण त्याची बॉडी ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका संकेतच्या कुटुंबिया कडून घेण्यात आली.
आरोपी कैलास धोत्रे व साथीदारां सकट 302 अंतर्गत गुन्हा दाखल
सगळ्या भिवंडीत तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. हल्ला झाल्याच्या दिवशी दिलेल्या तक्रारीनंतरच पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली त्यांनी करण लष्कर, दिनेश मोरे आणि चंदन ड्रायव्हर यांना अटक केली. पण या प्रकरणातला मुख्य आरोपी कैलास धोत्रे फरार होता. पोलिसांची पथक त्याच्या मागावर होती शेवटी 21 फेब्रुवारीच्या रात्री भिवंडी शहर पोलिसांनी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला त्याच्या आणखी साथीदारां सकट अटक केली. त्यांच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा ही दाखल करण्यात आला.
संकेतच्या अंतसंस्काराला प्रचंड गर्दी चर्चेचा विषय ठरली
संकेतच्या आणि त्या अंतसंस्काराला झालेली प्रचंड गर्दी ही चर्चेचा विषय ठरली आता या प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे देवा धोत्रे यांच्याकडून संकेत आणि त्याच्या मित्रांमध्ये आरोप करण्यात आले. कॉलेज बाहेर झालेल्या मारहाणीत संकेत आणि त्याच्या मित्रांनी मला शिवीगाळ केली लाथा बुक्क्यांनी मारहाण केली एकाने माझ्या छातीवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. पण मी माझ्या बचावासाठी माझा डावा हात पुढे केल्याने माझ्या डाव्या हाताला दुखापत झाली त्यानंतर त्या तिघांनी तिथून पळ काढला. असं देवानं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे.
संकेत आणि देवा दोन विद्यार्थ्यांमधला हा वाद होता
संकेत च्या मृत्यूनंतर लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. बघायला गेलं तर संकेत आणि देवा या कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांमधला हा वाद होता तो कदाचित काही दिवसांनी मिटला असता पण या वादातून संकेतला इतकी मारहाण झाली की त्यात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळालाय नेत्यांकडून लोकांकडून राजकीय आरोप केले जात आहेत संकेतच्या अंत्यसंस्काराला झालेली गर्दी ही लोकांमधला संताप दाखवून देणारी होती. पण संकेतच्या वडिलांचं कुटुंबाचं दुःख न संपणारे आपला 17 वर्षांचा हाताशी आलेला मुलगा एका किरकोळवादामुळे गमावल्याचं.