Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana | शिंदे सरकारची महिलांसाठी आणखी एक सोनेरी संधी, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा राशन कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी आनंदाची बातमी!
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana अर्ज भरताना राज्यात काही ठिकाणी महिला भगिनींची होणारी अडवणूक व कामातील दिरंगाई लक्षात घेऊन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पुरवठा विभागासह सर्व शासकीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी! सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असता, या घोषणेनंतर कागदपत्रांची जमवाजमाव महिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे अनेक जण रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती करून घेत आहेत, तसेच रेशन कार्ड मध्ये नाव लावणे किंवा कमी करण्याचे देखील काम करत आहेत.
या प्रक्रियेसाठी शासनाला अर्जदाराला शुल्क द्यावा लागत पण राज्य सरकारने हे शुल्क माफ केलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत नुकतीच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींना रेशनकार्ड सह इतर आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.
त्यामुळे शिंदे सरकारने आणखी एक गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांना दिल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana चा अर्ज भरण्यासाठी महिलांना रेशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक आहे. व त्यामुळे अर्ज भरण्यासाठी पुरवठा विभागाकडे माहेरच्या रेशन कार्ड मधून नाव कमी करणे आणि सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव लावण्यासाठी अधिक गर्दी होत आहे याबाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महिलांचे नाव कमी करणे आणि लावणे यासाठी लागणाऱ्या दाखल्याला आवश्यक असलेली शासकीय 33 रुपये फी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना महिलांचे अर्ज पुरवठा विभागाने तातडीने स्वीकारून ते मार्गी लावण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे महिला वर्गांला मोठा दिलासा मिळणार आहे. अर्जदार महिलेने रेशन कार्ड साठी अर्ज केल्यानंतर त्यांची पूर्तता करण्यासाठी कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असं छगन भुजबळ असे म्हणाले.
सर्वसामान्यांपर्यंत त्यांच्या हक्काचे धान्य सुरक्षितपणे पोहचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे!
सर्वसामान्य घटकांच्या हक्काचे मोफत व स्वस्त धान्य त्यांनाच मिळावे, अन्य कोणी त्याचा गैरफायदा घेऊ नये तसेच ठरल्याप्रमाणे पूर्ण धान्य लाभार्थ्यांना मिळावे यासाठी आपल्या अन्न व नागरी पुरवठा… pic.twitter.com/yOQ0ftbHAq
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) July 5, 2024
शासकीय यंत्रणांना निर्देश
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना राज्यात काही ठिकाणी महिला भगिनींची होणारी अडवणूक व कामातील दिरंगाई लक्षात घेऊन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पुरवठा विभागासह सर्व शासकीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
- ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी रेशनकार्ड तातडीने द्यावे.
- रेशनकार्डशी संबंधित कामांसाठी दिरंगाई किंवा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही.
- ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांनी संनियंत्रण ठेवावे.
- रेशनकार्डसह आवश्यक कागदपत्रे देण्यास दिरंगाई किंवा पैशाची मागणी होत असेल तर संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करावी.
- आवश्यक कागदपत्रांसाठी महिला भगिनींना रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे
- लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काय करावे लागेल?
- रेशन कार्ड
- इतर आवश्यक कागदपत्रे
- 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणे
महत्वाचे मुद्दे:
- रेशन कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी लागणारी फी माफ
- महिलांसाठी अर्ज प्रक्रियेत सुलभता
- 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढली
- महिलांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन
या निर्णयामुळे महिलांना काय फायदा होईल?
- रेशन कार्ड शुल्क वाचणार
- अर्ज प्रक्रियेत सुविधा
- योजनेचा लाभ घेणे सोपे होणार
या निर्देशांचे पुरवठा विभागासह संबंधित शासकीय विभागांकडून काटेकोर पालन होणे अपेक्षित आहे. जेणेकरून योजनेसाठी अर्ज करताना महिला भगिनींना कोणताही त्रास होणार नाही. यामुळे महिला भगिनींना नक्कीच दिलासा मिळेल आणि योजनेचा लाभ घेणे सुलभ होईल, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व्यक्त केला आहे.