योजना

Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024 | शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश | पिक विमा योजनेत सहभागी होण्याचा अंतिम दिनांक

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, आता पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त ₹1 भरावा लागेल!

Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024 : सन 2023-24 पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्या अनुषंगाने शेतकरी   हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 01 रुपया भरून योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.  पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र सीएससी (CSC) धारकास विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज 40 रुपये अदा करत असल्याने शेतकऱ्यांना प्रति अर्ज  चे एक रुपये व्यतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.  

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांचा सहभागी ऐच्छिक असून,  योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास सहभागी होण्या बाबतची घोषणापत्र,  योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मदतीच्या सात दिवस अगोदर कर्ज मंजूर केलेल्या बँकेत देणे आवश्यक आहे.  म्हणजे बँक विमा हप्ता कपात करणार आहे.

1.भाडेपट्टीने शेती करणारा नोंदणी करत रजिस्टर भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे  बंधनकारक आहे.

2.स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसानां मुळे बाधित विमाधारक  शेतकऱ्याने घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत सूचना देणे 1) PMFBY पिक विमा ॲप वर 2) विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करणे.  तक्रारीचा लेख अर्ज 3) कृषी विभाग,4)  आपले सामूहिक सेवा केंद्र  सीएससी (CSC)  किंवा 5) बँकेमध्ये देणे आवश्यक आहे.

त्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव,  पिक विमा पावती क्रमांक व मोबाईल क्रमांक,  आपत्तीचा प्रकार,  बाधित पिकानुसार गट क्रमांक इत्यादी माहिती नमूद करून देणे आवश्यक आहे. PMFBY या योजनेमध्ये स्थानिक  नैसर्गिक आपत्तीमध्ये भात पीक  जलमय झाल्यास तसेच कापूस हे पीक काढणी कारणास्तव आपत्ति मध्ये संरक्षित नाही.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana | शिंदे सरकारची महिलांसाठी आणखी एक सोनेरी संधी, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा राशन कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी आनंदाची बातमी!

Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024

पिक विमा योजनेत सहभागी होण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै 2024 आहे.

खालील बाबींसाठी संरक्षण देणे हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश आहे 

(1). प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी/लावणी/उगवण न होणे

हंगामातील अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/ लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/ लावणी न झालेले क्षेत्रहे सर्व साधारण पेरणी क्षेत्राच्या 75  टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील.  सदरची नुकसान भरपाई ही विमा संरक्षित रकमेच्या 25  टक्के पर्यंत मर्यादित  देय राहील व  सदर क्षेत्राचे विमा संरक्षण संपुष्टात येईल.

(2). हंगामातील प्रतिकूल परिस्थिती झालेले नुकसान

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत,  मात्र सर्वसाधारण काढण्याच्या 15 दिवस  आधीपर्यंत पूर,  पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी.  बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनांमध्ये मागील लगतच्या 7 वर्षाच्या  सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील.

(3). स्थानिक नैसर्गिक आपत्ती

या बाबी अंतर्गत गारपीट,  भूस्खलन,  पूर,  विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,  ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारे नैसर्गिक आज या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल. 

(4). काढणी पश्चात नुकसान

ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंड्या बांधून सुकविणे करणे आवश्यक असते अशा  कापणी/ काढणी नंतर शिकविण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (14 दिवस)  गारपीट,   चक्रीवादळ,  चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

(5). पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट 

दुष्काळ,  पावसातील खंड,  पूर,  क्षेत्र,   जलमय होणे,  कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन,  नैसर्गिक आग,  वीज कोसळणे,  वादळ,  गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या  घटी पासून व्यापक विमा संरक्षण दिले जाईल

अधिक माहितीसाठी:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button