Video व्हायरल | भटक्या कुत्र्यांचा मुलीवर हल्ला; स्थानिकांनी वाचवला मुलीचा जीव

शनिवारी, 9 मार्च 2024 रोजी | उत्तर प्रदेश या राज्यातील अमरोहा भागात एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओमध्ये पाच कुत्रे मुलीचा पाठलाग करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या फुटेजमध्ये चार ते पाच भटके कुत्रे मुलीवर हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी मध्यस्ती करत भटक्या कुत्र्यांची टोळी हुसकाउन लावली व त्या मुलीचे प्राण वाचवले शहराच्या नगर कोतवाली परिसरात कुत्र्यांची दहशत असल्याचे समजते. येथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याअगोदरही कित्येकवेळा या कुत्र्यांनी परिसरातील नागरिकांवर हल्ला केला आहे. या घटनेमुळे या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
#CaughtOnCamera: Pack Of Dogs Chase, Maul Child In UP's #Amroha
5 year old dragged, attacked by strays
Young girl hospitalised, traumatised#UttarPradesh | @SnehaMKoshy pic.twitter.com/cTQKpC6w22
— Mirror Now (@MirrorNow) March 9, 2024