देश- विदेश

Bihar Bridge Collapsed | 12 कोटी गेले पाण्यात; पुलाचे उद्घाटन करायच्या आधीच पुल गेला वाहून | Viral Video Bihar

Bihar Bridge Collapsed : बिहारच्या अररिया जिल्ह्यात बकरा नदीवर बांधण्यात आलेला पुल मंगळवारी कोसळला. 12 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या या पुलाचे उदघाटन देखील झाले नव्हते. चिकटी आणि खुर्साकांटा या दोन भागांना जोडणारा हा पुल होता. या पुलाचे दोन ते तीन खांब नदीत फसले आणि पूल पडला. नेपाळ नदीतून पाणी आल्याने चिकटी येथून वाहणाऱ्या बकरा नदीवरील पडरिया घाटावर बांधण्यात आलेले पुलाचे दोन खांब पडले, तर एक रुतून बसला. या पुलाचे बांधकाम तर झाले होते पण, त्याच्या ऍप्रोच मार्ग न बांधल्याने हा पुल सुरु करण्यात आला नव्हता.

स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त

बिहारच्या अररिया जिल्ह्यातील पररिया गावात बकरा नदीवर बांधलेला नवीन पुल मंगळवारीच्या दिवशी कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने कसली ही जीवितहानी झालेली नाही, असे सांगण्यात येत आहे. हा पुल पूर्णपणे बांधलेला नव्हता आणि लोकांना जाण्याची अनुमति नव्हती. तरी सुद्धा, पूल कोसळल्याचे दृश्य भयानक आहे आणि या घटनेने तेथे परिसरात राहणार्‍या स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

पाहतापाहता पुल झाला उद्वस्त, पुल पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वरती धुमाकूळ घालता आहे. यातून पुल खराब दर्जाच्या साहित्यापासून बनवण्यात आला होता आणि बांधकामातही काही त्रुटी होत्या अशा आरोपांना उधाण आले आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे आणि ज्यांनी हा पुल बनविला त्यांच्या वरती कारवाई करण्यात येईल असे बिहार प्रशासनाने आश्वासन दिले आहे.

सुरुवातीला पुलाचे बांधकाम केल्यानंतर नदीच्या किनाऱ्यापासून वंचित राहिल्यामुळे १२ कोटी रुपये खर्च केले तरी सुद्धा हा नदीपत्राच्या किनाऱ्याला पर्यंत जोडण्यात आला होता पुल. 12 कोटी खर्च करून बांधलेला हा पुल भाजपचे आमदार विजय कुमार मंडल व खासदार प्रदीप कुमार यांनी बांधनिकरनासाठी प्रयत्न केले होते, असे सोशल मीडिया वरती सांगण्यात येत आहे.

गुत्तेदारांच्या काम – कचुराई मुळे पुलाचे उद्घाटन होण्याधीच पूल जलमय झाला. प्रशासनाच्या अधिकार्‍यानी पुल बांधणीकामाकडे लक्ष दिले नसल्यामुळे १२ कोटी रुपये खर्च केलेला हा पुल उध्वस्त झाला असे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओ पहा :- लिंक

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button